डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये रुग्णांना सकस आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:10 AM2021-05-21T04:10:57+5:302021-05-21T04:10:57+5:30
आमदार राहुल कुल रुग्णांना सकस व दर्जेदार आहार कसा मिळेल या दृष्टीने स्वतःहून लक्ष देत आहेत. रुग्णांना सकाळी आठ ...
आमदार राहुल कुल रुग्णांना सकस व दर्जेदार आहार कसा मिळेल या दृष्टीने स्वतःहून लक्ष देत आहेत. रुग्णांना सकाळी आठ वाजता चहा दिला जातो. नाश्त्याला उपमा, पोहे, रवा, इडली, सांबर यापैकी एक पदार्थ असतो. दुपारी १२ ते १ वाजता जेवण त्यामध्ये कडधान्याची उसळ, पालेभाज्या, भात चपाती सॅलड यांचा समावेश असतो. सायंकाळी ४.०० वाजता काढा ,चहा, फ्रुट सॅलड, ज्यूस, हळदी दूध यांचा समावेश असतो. रात्री ८ ते ९ वाजता भरपूर जेवण दिले जाते. या कोविड सेंटरला रुग्णांच्या सेवेसाठी अनेक सामाजिक संस्था व व्यक्ती पुढे आलेल्या आहेत. यासंदर्भात एक रुग्ण म्हणाला की, गेल्या पाच दिवसांपासून मी या सेंटरला आहे सकस व दर्जेदार आहार व वेळेमध्ये दिलेली आहार व औषधोपचार यामुळे मी सध्या बरा झालो आहे.