खाद्यपदार्थांना येणार आरोग्यदायी स्वाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 06:41 PM2019-02-07T18:41:27+5:302019-02-07T18:51:41+5:30

प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याबाबत सजग असल्याने अधिकाधिक नैसर्गिक पद्धतीच्या खाद्यपदार्थांचा वापर करताना दिसत आहे.

Healthy flavor will come to the foodstuff | खाद्यपदार्थांना येणार आरोग्यदायी स्वाद 

खाद्यपदार्थांना येणार आरोग्यदायी स्वाद 

Next
ठळक मुद्देजिवोदॉनचा प्रकल्प रांजणगाव येथे सुरु : पेय, स्नॅक्स खाता येणार मोकळेपणानेअगदी भेळीसारखा प्रकार घेतल्यास, त्याचा स्वाद, रंग आणि सुगंध ग्राहकांना आकर्षित करणारा मसाले आणि इतर नैसर्गिक पदार्थ असे ५० टक्के कच्चा माल स्थानिक बाजारपेठेतून खरेदी देशात पारंपारिक नाश्त्याऐवजी कुकीज आणि बेकरी पदार्थांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर विकसित

पुणे : प्रत्येक व्यक्ती आता आपल्या आहाराबद्दल जागरुक झाला आहे. त्यामुळे आहार घेत असलेल्या आहारात किती कॅलरी आहेत, हे तो पाहात आहे. कारण त्याला सडपातळ आणि निरोगी शरीर हवे आहे. याचे भान ठेऊन कमी साखर, फॅट कमी असलेले पदार्थ त्याची चव कायम ठेवत बनविण्याची पद्धत कंपनीने विकसित केली आहे. त्यामुळे प्रत्यक खाद्यपदार्थ आरोग्यदायी आणि सकस बनविण्याकडे कल असल्याची माहिती जिवोदॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिलस अँड्रीयर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 
जिवोदॉनच्या फ्लेवर्स विभागाच्या आशिया- पॅसिफिक क्षेत्राच्या व्यावसायिक प्रमुख मोनिला कोठारी, लुई डिअमिको या वेळी उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी येथे तब्बल ४० हजार चौरसफुटांवर स्वाद आणि सुगंध क्षेत्रातील आघाडीच्या जिवोदॉनने प्रकल्प उभारला आहे. येथे कंपनीने ६० दशलक्ष स्विस फ्रँकची गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पातून द्रवकचरा निर्माण होणार नाही. तसेच, सौरऊजेर्चा वापर येथे मोठ्या प्रमाणावर करण्यात येईल.
 अँड्रीयर म्हणाले, प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याबाबत सजग असल्याने अधिकाधिक नैसर्गिक पद्धतीच्या खाद्यपदार्थांचा वापर करताना दिसत आहे. प्रसंगी बाजारातील किंमतीपेक्षा अधिक किंमत मोजायला देखील तो तयार आहे. विविध खाद्य उत्पादक कंपन्यांसाठी नैसर्गिक पदार्थांचा अधिक वापर असलेली, आरोग्यदायी आणि स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात येत आहे. आत्तापर्यंत खाद्यपर्दांचे ६० हजारांहून अधिक खाद्यपदार्थ बनविण्याच्या पद्धती शोधून काढल्या आहेत. त्यासाठी आवश्यक मसाले आणि इतर नैसर्गिक पदार्थ असे ५० टक्के कच्चा माल स्थानिक बाजारपेठेतून खरेदी केला जातो.  
जिवोदॉनच्या फ्लेवर्स विभागाच्या आशिया-पॅसिफिक क्षेत्राच्या व्यावसायिक प्रमुख मोनिला कोठारी म्हणाल्या, देशात पारंपारिक नाश्त्याऐवजी कुकीज आणि बेकरी पदार्थांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. हे पदार्थ स्वादिष्ट असण्या बरोबरच आरोग्यदायी देखील कसे होतील, याकडे लक्ष देण्यात येत आहे. अगदी भेळीसारखा प्रकार घेतल्यास, त्याचा स्वाद, रंग आणि सुगंध ग्राहकांना आकर्षित करणारा असेल. त्यामुळे अगदी स्थानिक बाजारातील पदार्थ देखील देशी आणि जागतिक पातळीवर कसे पोहोचविता येईल, यावर आम्ही काम करु. 

Web Title: Healthy flavor will come to the foodstuff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न