आरोग्यदायी ग्रीन होम्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:23+5:302021-06-19T04:09:23+5:30
ग्रीन होम्स कशासाठी? घरोघरी होणारा वीज आणि पाणी यांचा वापर आपल्या खिशावर परिणाम करत असतो. उन्हाळा आला की विजेचं ...
ग्रीन होम्स कशासाठी?
घरोघरी होणारा वीज आणि पाणी यांचा वापर आपल्या खिशावर परिणाम करत असतो. उन्हाळा आला की विजेचं बिल वाढतं. वीज ही भरपूर वापरली जाते. घरांची दारं-खिडक्या बंद होऊन वातानुकूलन यंत्रणा म्हणजेच एसी सुरू केले जातात. यामुळे खर्चही वाढतो. मात्र ग्रीन होम्समध्ये नैसर्गिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर केला जातो. या नव्या यंत्रणेमध्ये सौरऊर्जेचा वापर करून तयार झालेली वीज वापरली जाते. रेनवॉटर हार्वेस्टिंग करून भूजलपातळी वाढवली जाते. पावसाचे पाणी वाचवून त्याचा उपयोग दैनंदिन वापरासाठी केला जातो. यामुळे तुमच्या विजेच्या बिलावर मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्यात २० ते ३० टक्के कपात होऊ शकते. आरोग्यासाठी काय फायदा?- ग्रीन होम्समध्ये नैसर्गिक साधनांचा जास्त वापर केल्यामुळे हवेशीर आणि उत्तम प्रकाशव्यवस्थेची योजना केलेली असते. नैसर्गिक हवेचा उपयोग, हवा शुद्धीकरणासाठी नैसर्गिक उपायांचा वापर, झाडांचा अधिकाधिक वापर, खिडक्यांमधून प्रकाश जास्त यावा अशी केलेली योजना, सौर चिमणी, एक्झॉस्ट फॅनचा वापर, नैसर्गिक रंगांचा वापर यामुळे तुमचे राहणीमान आरोग्यवर्धक होते.
इको फ्रेंडली वस्तूंचा वापर घरामध्ये केल्यामुळे तुमची जीवनपद्धती निसर्गाशी एकदम पूरक होते. उदाहरणार्थ, ग्रीन होम्समध्ये बांबू, पुनर्वापर केलेले धातूचे सुटे भाग, क्ले प्लॅस्टर, इको फ्रेंडली फर्निचर, बांबूचे फर्निचर, फिक्या रंगाची अंतर्गत सजावट केल्यामुळे एकूण जीवनशैली सुधारते.