चिवचिवाट ऐकण्यासाठी 'चला चिमणी वाचवू या ! ".

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:24+5:302021-03-20T04:10:24+5:30

नेचर फॉरेव्हर या संस्थेच्या पुढाकाराने सन २०१० पासून २० मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. पहिल्याच ...

To hear the chirping, 'Let's save the chimney! ". | चिवचिवाट ऐकण्यासाठी 'चला चिमणी वाचवू या ! ".

चिवचिवाट ऐकण्यासाठी 'चला चिमणी वाचवू या ! ".

Next

नेचर फॉरेव्हर या संस्थेच्या पुढाकाराने सन २०१० पासून २० मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. पहिल्याच वर्षी जगभरातून या मोहिमेला प्रतिसाद मिळाला गेल्या काही वर्षात या उपक्रमाने मोठी जनजागृती झाली आहे. पूर्वीच्याकाळी शहरासह ग्रामीण भागात मातीची घरे होती मात्र बदलत्या काळानुसार मातीची घरे जाऊन सिमेंट कॉंक्रीटची जंगले उभी राहिली

झाडे तोडली गेली आणि चिमण्यांना घरटी बांधायला जागाच उरली नाही याचा परिणाम म्हणून चिमण्यांची संख्या हळूहळू कमी झाली.

मोबाईलच्या ध्वनिलहरी मुळेही चिमणी यावरही दुष्परिणाम होत असल्याचे काही संशोधनांमधून समोर आले असून ध्वनी लहरीच्या प्रकोपाने अंडी न उगवताच खराब होतात किंवा पिल्लू निघाले तर लहरीच्या प्रकोपाने होण्यापूर्वीच मरून जाते हेही चिमण्यांची संख्या कमी होण्याचे महत्त्वाचे कारण आहेच .

ग्रामीण भागात शेतीच्या प्रदेशात अगदी शहर सोडून थोडं बाहेर गेलं तरी आजही चिमण्या दिसतात अगदी भरपूर नाही पण दिसतात मात्र नक्की पहाटे उठल्याउठल्या मन प्रसन्न करणारा चिमणीचा चिवचिवाट ऐकू यावा चिमण्यांनी अंगणात बागडावे यासाठी त्यांना निवारा आणि खाद्य उपलब्ध करून देऊ या.

--

हे करता येईल -

फ्लॅट,घराच्या टेरेसवर खिडकीवर चिमण्यांसाठी धान्य चपातीचे तुकडे आणि पिण्यासाठी पाणी

चिमण्यांना पाण्यात खेळायला खूप आवडते त्यामुळे मातीचे मोठे भांड्यामध्ये पाणी ठेवू शकता

रिकामी खोकी किंवा तत्सम वस्तूचे घरटे

गच्चीवर अंगणात मूठभर धान्य पाण्याची सोय करूया

--

फोटो क्रमांक: १९कान्हूरमेसाई चिमणी घरटे

शिरूर येथील शेतकरी विकास पुंडे व त्यांच्या मातोश्री श्रीमती भागुबाई पुंडे यांनी चिमण्यांसाठी उन्हाळ्यात भासणारे अन्नधान्याची सोय म्हणून आपल्या शेतातील एक एकर ज्वारीचे पीक न काढता चिमण्यांसाठी राखून उभे ठेवले आहे.

दुसऱ्या छायाचित्रात कानुर मेसाई येथील विद्याधाम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चिऊ ताई साठी बनविलेल्या घरटे सह सोबत प्राचार्य अनिल शिंदे व रवी शेळके

Web Title: To hear the chirping, 'Let's save the chimney! ".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.