PMC Election: प्रभाग रचनेच्या हरकती व सूचनांवर २४ व २५ फेब्रुवारीला सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 12:14 PM2022-02-20T12:14:01+5:302022-02-20T12:16:30+5:30

१ ते १४ फेब्रुवारीदरम्यान महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतून प्रारूप प्रभाग रचनेवर ३ हजार ५९६ हरकती व सूचना आल्या आहेत

Hearing on objections and suggestions of ward formation on 24th and 25th February in Pune Municipal Corporation election | PMC Election: प्रभाग रचनेच्या हरकती व सूचनांवर २४ व २५ फेब्रुवारीला सुनावणी

PMC Election: प्रभाग रचनेच्या हरकती व सूचनांवर २४ व २५ फेब्रुवारीला सुनावणी

Next

पुणे: महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या ५८ प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकती व सूचनांवर येत्या २४ व २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. 

१ ते १४ फेब्रुवारीदरम्यान महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतून प्रारूप प्रभाग रचनेवर ३ हजार ५९६ हरकती व सूचना आल्या आहेत. यंदा प्रभागावर हरकती व सूचनांची संख्या मोठी असल्याने निवडणूक आयोगाने दोन दिवस यावर सुनावणी घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. हे वेळापत्रक महापालिकेच्या www.pmc. gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार २४ व २५ फेब्रुवारी अशी दोन दिवस बालगंधर्व रंगमंदिरात सुनावणी होणार आहे. या हरकती सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२४ फेब्रुवारी

प्रभाग क्रमांक १ ते ९ : सकाळी १० ते ११.३०
प्रभाग क्रमांक १० ते १६ : सकाळी ११.३० ते दुपारी १ पर्यंत
प्रभाग क्रमांक १७, १८,१९,२०, ३०,३१,३३, ३५ : दुपारी २.३० ते ४
प्रभाग क्रमांक २७,२८,२९ : सायंकाळी ४ ते ६

२५ फेब्रुवारी

प्रभाग क्रमांक : २१, २२, २३, २४, २५, २६, ४१, ४२,४३,४५, ४६
वेळ : सकाळी १० ते ११.३०
प्रभाग क्रमांक : ३७,३८,३९,४०
वेळ : सकाळी ११.३० ते दुपारी १ पर्यंत
प्रभाग क्रमांक : ४७,४८,४९,५०,५७
वेळ : दुपारी २.३० ते ३.३० पर्यंत
प्रभाग क्रमांक : ५१, ५३,५४,५५,५६
दुपारी ३.३० ते ४.३०
सर्वसाधारण हरकती करिता वेळ
सायंकाळी ४.३० ते ६ वाजेपर्यंत.

''महापालिकेच्या संकेतस्थळावर सोमवार ( दि.२१) पासून सर्व हरकती व सूचना व त्यावर देण्यात आलेली वेळ प्रसिद्ध केली जाणार आहे.  प्रभाग क्रमांक ५८ ( कात्रज गोकुळनगर) मध्ये काहीही हरकती सूचना नसल्याने त्याचा समावेश या वेळापत्रकात नाही. समान हरकती व सूचना यांचे गट तयार करून त्यावर एकत्रित सुनावणी होणार आहे असे अजित देशमुख (निवडणूक अधिकारी, पुणे महापालिका) यांनी सांगितले.''

Web Title: Hearing on objections and suggestions of ward formation on 24th and 25th February in Pune Municipal Corporation election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.