रोहित टिळक यांच्या जामिनावर आज सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:09 AM2017-08-01T04:09:07+5:302017-08-01T04:09:07+5:30
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहित टिळक यांना मंजूर करण्यात आलेला अंतरिम जामीन रद्द करण्याच्या मागणीवर उद्या (मंगळवारी) न्यायालयात सुनावणी होणार आहे.
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहित टिळक यांना मंजूर करण्यात आलेला अंतरिम जामीन रद्द करण्याच्या मागणीवर उद्या (मंगळवारी) न्यायालयात सुनावणी होणार आहे.
फिर्यादीतर्फे रोहित टिळक यांना मंजूर करण्यात आलेला अंतरिम जामीन रद्द करण्यात यावा म्हणून कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. सोमवारी कोर्टात या अर्जावर सुनावणी होणार होती. सोमवारी कोर्टात टिळक यांचा जामीन रद्द करावा तसेच या प्रकरणात दोघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी फिर्यादी महिलेच्या वकिलांनी न्यायालयात केली.
फिर्यादी महिलेच्या वकिलांकडून या खटल्यासंबंधी कागदपत्रांची प्रत सादर करण्यात आलेली नाही. तसेच जामिनावरील सुनावणीसाठी पुढील तारीख देण्यात यावी, अशी मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली.