दरमहा तीनशे प्रकरणांवर सुनावणी

By admin | Published: June 2, 2017 02:48 AM2017-06-02T02:48:22+5:302017-06-02T02:48:22+5:30

‘स्थायी लोकअदालत’ या आधुनिक न्यायप्रक्रियेनुसार सुरू असलेल्या न्यायालयात आजतागायत पुण्यातील शंभरहून अधिक प्रकरणे

Hearing on three hundred cases per month | दरमहा तीनशे प्रकरणांवर सुनावणी

दरमहा तीनशे प्रकरणांवर सुनावणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘स्थायी लोकअदालत’ या आधुनिक न्यायप्रक्रियेनुसार सुरू असलेल्या न्यायालयात आजतागायत पुण्यातील शंभरहून अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तसेच दरमहा सुमारे तीनशे प्रकरणांवर सुनावणी केली जाते.
न्यायालयात वषार्नुवर्षे चालणारे खटले, न्यायाच्या अपेक्षेत हेलपाटे करणारे नागरिक अशी परिस्थिती अनेक न्यायालयांमध्ये दिसून येते. वेळ आणि पैशाचा अपव्यय करूनही निकाल कधी लागेल,याची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी स्थायी लोकअदालतमुळे दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यात मुंबई, नागपूर, औरंगाबाद व पुणे या चार ठिकाणी ‘स्थायी लोकअदालत’ स्थापन करण्यात आली आहे.
‘स्थायी लोकअदालत’मुळे नागरिकांना जलद न्याय मिळण्यास मदत होणार आहे. मध्यम मार्ग काढून तडजोडीची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यात येतात. मात्र, त्याला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही. याबाबत जनजागृती होण्याची आवश्यकता आहे, असेही व्यवस्था राबविणाऱ्यांचे म्हणणे आहे.
लोकउपयोगी सेवांसंबंधित तक्रारींच्या निवारणासाठी ‘स्थायी लोकअदालत’ स्थापन करण्यात आले आहे. लोकांमध्ये संवाद घडवून मध्यममार्ग काढून खटला निकाली काढण्यास प्राधान्य दिले जाते. यामध्ये वाहतूक, सेवा, टपाल, तार, दूरध्वनी, वीज, पाणीपुरवठा, नदी, नाले, बंदरे, आरोग्य सेवा, विमा, निवृत्त वेतन यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. शिक्षण व निवारा (बांधकाम व्यवसाय)
यांचाही समावेश लोकउपयोगी सेवांमध्ये करण्यात आला आहे. त्याबाबतच्या खटल्यांची सुनावाणीही ‘स्थायी लोकअदालत’मध्ये करण्यात येते.
‘स्थायी लोकअदालत’मध्ये निवृत्त न्यायाधीश अध्यक्ष असून सार्वजनिक उपयुक्तता सेवांबाबत दोन अनुभवी व्यक्ती सदस्यपदी काम पाहतात. त्याचप्रमाणे स्थायी लोकअदालतमध्ये पंचवीस लाख रुपये किंमतीपर्यंतचे वाद सामंजस्याने सोडविले जातात. महत्त्वाचे म्हणजे प्रकरणांचा निकाल गुणवत्तेनुसार लावला जातो. त्यामुळे बरीचशी प्रकरणे प्रचलित न्यायालयांमध्ये दाखल होण्यापूर्वीच निकाली निघू शकतात.

दूरध्वनी सेवेसंदर्भात अधिक तक्रारी

पुण्यातील या न्यायालयात आतापर्यंत सर्वाधिक तक्रारी या दूरध्वनीसेवेसंदर्भात आल्या असून त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांविरोधात तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण अधिक आहे. आरोग्य संदर्भात चार तक्रारी दाखल झाल्या आहेत.

‘स्थायी लोकअदालत’मध्ये संमतीने निकाल होत असल्याने त्यामध्ये संवादातून तोडगा निघू शकतो. त्यामुळे लोकांनी याचा वापर करून घेण्याची गरज आहे. मात्र नवीन खटले दाखल होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थायी लोक अदालत जास्तीत जास्त उपयोग करावा. - दिनकर कांबळे

Web Title: Hearing on three hundred cases per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.