जिल्हाधिकारी कार्यालयातील सुनावण्या दोन आठवडे स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:12 AM2021-04-09T04:12:28+5:302021-04-09T04:12:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. यामुळेच शासनाने राज्यसह जिल्ह्यात कडक ...

Hearings at the Collector's Office adjourned for two weeks | जिल्हाधिकारी कार्यालयातील सुनावण्या दोन आठवडे स्थगित

जिल्हाधिकारी कार्यालयातील सुनावण्या दोन आठवडे स्थगित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. यामुळेच शासनाने राज्यसह जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्ह्यातील हा वाढता प्रादर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुली सुनावण्या दोन आठवड्यासाठी स्थगित करण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख यांनी सांगितले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत महसूलच्या सुनावण्या तब्बल सहा महिन्यापेक्षा अधिक दिवस स्थगित होत्या. यामुळेच महसुली प्रलंबित दाव्याची संख्या खूप वाढली होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ऑक्टोबर पासून पूर्ण क्षमतेने पुन्हा एकदा सुनावण्या सुरुवात केल्या होत्या. दर आठवड्याला सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवस सुनावण्या घेतल्या जात. जिल्हाधिकाऱ्यांकडे महिन्याला सरासरी ५० नवीन प्रकरणे दाखल होतात. देशमुख यांनी सुनावण्याचा वेग वाढवून महिन्याला तब्बल शंभर प्रकरणात निकाल देत होते. तरी देखील जिल्ह्यात तब्बल तीन हजार पेक्षा अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे गेल्या सहा महिन्यांपासून महसुली दाव्यांच्या सुनावण्या ठप्प होत्या. अखेर या दाव्यांच्या सुनावण्या सोमवार (दि.५) पासून सुरू झाल्या. पहिल्या दिवशी ३९ दाव्यांच्या सुनावण्या घेण्यात आल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्याकडे तहसिलदार, प्रांत अधिकारी यांच्याकडे विरोधात गेलेल्या महसुली प्रकरणांचे आपली अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले जाते. परंतु आता पुन्हा एकदा सुनावण्याना स्थगिती देण्यात आली आहे.

Web Title: Hearings at the Collector's Office adjourned for two weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.