ह्रदयद्रावक ! 9 महिन्यांच्या मुलीसह रेल्वेखाली उडी घेऊन आईची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 12:16 PM2020-12-15T12:16:20+5:302020-12-15T14:34:09+5:30
याप्रकरणी शितलचे मामा विजय रामचंद्र सांळुके ( वय ४२, रा. सर्वे क्रमांक १३१, शिंदेवस्ती, हडपसर, पुणे. ) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मयत शितल यांचा विवाह १५ वर्षापुर्वी झालेला असून त्यांना ४ मुली आहेत.
लोणी काळभोर - येथील पुणे - दौंड रेल्वे मार्गावर एका विवाहितेने आपल्या ९ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीसह रेल्वेखालीआत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. शितल देवराम मखवाने (वय २७ ) व शुभ्रा ( वय ९ महिने. दोघी रा. वारजे माळवाडी, रामनगर, पुणे ) ही आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावे आहेत, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
याप्रकरणी शितलचे मामा विजय रामचंद्र सांळुके ( वय ४२, रा. सर्वे क्रमांक १३१, शिंदेवस्ती, हडपसर, पुणे. ) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मयत शितल यांचा विवाह १५ वर्षापुर्वी झालेला असून त्यांना ४ मुली आहेत. गेले ९ महिने पासून त्या व मुलगी शुभ्रा या दोघी आजीकडे लोणी काळभोर येथे रहात होत्या. लोणी काळभोर पोलीसांनी माहितीनुसार, सोमवार ( १४ डिसेंबर ) रोजी रात्री ९ - ३० वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रामा कृषी रसायन लिमिटेड या खतनिर्मिती करत असलेल्या कंपनीजवळ पुणे - दौंड रेल्वे मार्गावर शितल व शुभ्रा या दोघींचे मृतदेह आढळुन आले. सदरबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांची ओळख पटलेनंतर अकस्मात मृत्यूची नोंद करून दोघींचेही मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठवले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर व त्यांचे सहकारी करीत आहेत.