हृदयद्रावक! वडिलांबरोबर पोहायला गेलेला, नऊ वर्षांचा मुलगा पाण्यात बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 11:55 IST2024-10-07T11:54:36+5:302024-10-07T11:55:06+5:30
स्थानिक व पोलिसांनी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. मृतदेह अखेर काही तासांनंतर सापडला.

हृदयद्रावक! वडिलांबरोबर पोहायला गेलेला, नऊ वर्षांचा मुलगा पाण्यात बुडाला
राजगुरूनगर: वडिलाबरोबर पोहायला शिकायला गेलेला नऊ वर्षीय मुलगा पाण्यात बुडाला. कनेरसर (ता खेड ) येथे सडकवस्ती रविवारी (दि. ६) सकाळी दहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
कनेरसर येथील सडकवस्ती येथे दुर्वेश संदेश हजारे हा नववर्षीय चिमुकला वडिलांबरोबर विहीरीत पोहण्यासाठी गेला होता. दूर्वेशच्या पाठीला बांधलेले पेटे सुटल्यामुळे पाण्यात बुडाला. खेड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थानिक लोकाकडून पाण्यात शोध घेतला. मात्र दुर्वेशचा मृत्यदेह मिळून आला नाही.
स्थानिक व पोलिसांनी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. मृतदेह अखेर काही तासांनंतर सापडला. ही घटना ऐकून गावात शोककळा पसरली असून, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.