कोकण तापले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 04:48 AM2018-03-12T04:48:25+5:302018-03-12T04:48:25+5:30
कोकणातील कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून, गेले काही दिवस रायगड जिल्ह्यातील भिरा हे देशातील सर्वांत उष्ण ठिकाण ठरत आहे़ शनिवारी येथे देशातील सर्वाधिक कमाल तापमान ४०़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
पुणे - कोकणातील कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून, गेले काही दिवस रायगड जिल्ह्यातील भिरा हे देशातील सर्वांत उष्ण ठिकाण ठरत आहे़ शनिवारी येथे देशातील सर्वाधिक कमाल तापमान ४०़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.रविवारी त्यात आणखी वाढ होऊन ते ४२ अंशांपर्यंत पोहोचले. दरम्यान, अकोला आणि यवतमाळ येथे रविवारी पाऊस, तर काही ठिकाणी गारपीटही झाली.
पठारावरून वारे खाली समुद्रसपाटीला उतरताना त्यांच्या तापमानात ५ अंश सेल्सिअसने वाढ होत असते़ त्यामुळे सध्या कोकणातील सर्वच ठिकाणच्या तापमानात वाढ झालेली दिसत आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ५ अंश सेल्सिअसने कमी झाले आहे़ मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे़
तसेच रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत अकोला येथे १० मिमी आणि यवतमाळ येथे २० मिमी पावसाची नोंद झाली होती़ रविवारी दिवसभरात अकोल्याला ४ मिमी आणि यवतमाळ येथे ६ मिमी पाऊस झाला होता़