Maharashtra: राज्यभरात उकाडा कायम; विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 10:29 AM2024-05-08T10:29:38+5:302024-05-08T10:30:26+5:30
मंगळवारी (दि.७) सर्वाधिक उच्चांकी तापमान अकोल्यात ४३.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले तर सर्वांत कमी किमान तापमान १९ अंशांवर महाबळेश्वर येथे नोंदले गेले.....
पुणे : राज्यात ढगाळ वातावरण असून, विदर्भ, मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तसेच काही भागांत गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा दिला आहे तर काही ठिकाणी मात्र उन्हाचा कडाका कायम राहणार आहे. मंगळवारी (दि.७) सर्वाधिक उच्चांकी तापमान अकोल्यात ४३.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले तर सर्वांत कमी किमान तापमान १९ अंशांवर महाबळेश्वर येथे नोंदले गेले.
हवामान विभागाने बुधवारी (दि.७) विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यातील काही भागांत गारपीट होईल, असा अंदाज दिला आहे तसेच पुढील दोन ते तीन दिवस हिंगोली, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील काही भागांत विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे.