विदर्भ, उत्तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 08:35 PM2019-04-25T20:35:47+5:302019-04-25T20:55:36+5:30
विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडत उष्णतेची लाट आली असून ही उष्णतेची लाट पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे : विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडत उष्णतेची लाट आली असून ही उष्णतेची लाट पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४६़३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. रात्रीच्या किमान तापमानातही राज्यात सर्वत्र वाढ झाली असून सर्वात कमी किमान तापमान नांदेड येथे २१़४ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे़. देशातील सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे नोंदविले गेले आहे.
पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भात काही ठिकाणी तसेच ओडिशा, दक्षिण उत्तर प्रदेश, दक्षिण राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात येथे अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे़. त्यात पुढील काही दिवसात वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची ही लाट पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे़.
मध्य महाराष्ट्रात सर्वत्र जवळपास ४१ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान गेले असून रात्रीच्या तापमानातही सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे़.
२८ ते २९ एप्रिल रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. २६ एप्रिल रोजी विदर्भात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़. २७ ते २९ एप्रिल रोजी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट तर तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे़. उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़.
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस) :
पुणे : 41.6
लोहगाव 41.8
अहमदनगर 43.4
जळगाव 43
कोल्हापूर 40.7
महाबळेश्वर 33.4
मालेगाव 42.6
नाशिक 40.5
सांगली 41.2
सातारा 40.4
सोलापूर 42.8
मुंबई 32.5
सांताक्रुझ 34.8
अलिबाग 31.8
रत्नागिरी 33.6
पणजी 34.4
डहाणु 34.5
उस्मानाबाद 42.1
औरंगाबाद 42.5
परभणी 45
अकोला 46.3
अमरावती 40.5
बुलढाणा 42.5
चंद्रपूर 45.4
गोंदिया 39.8
नागपूर 44.3
वाशिम 43.8
वर्धा 45.5
यवतमाळ 44.4