पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 09:27 AM2024-05-22T09:27:12+5:302024-05-22T09:28:08+5:30

बुधवारपासून (दि.२२) विदर्भ, मराठवाडा आणि पुण्यातही उष्णतेची लाट येईल, असा इशारा ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे...

Heat wave warning in Vidarbha, Marathwada along with Pune; Forecast by Meteorological Department | पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पावसाचा इशारा

पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पावसाचा इशारा

पुणे : मान्सूनपूर्व वादळी पावसाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुण्याला चांगलेच झोडपले आहे. मंगळवारी (दि.२१) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस येईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, बुधवारपासून (दि.२२) विदर्भ, मराठवाडा आणि पुण्यातही उष्णतेची लाट येईल, असा इशारा ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे.

मान्सून सध्या अंदमान निकोबार बेटावर दाखल झालेला आहे. तिथून मान्सून पं. बंगालच्या उपसागरातील काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग पुढील दोन दिवसांमध्ये व्यापेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. दरम्यान, हरियाणा पासून ते मराठवाड्यापर्यंत हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठवाडा, प. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मंगळवारी (दि.२१) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, हिंगोली, परभणी, जालना, बीड, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील दोन दिवस राज्यातील विदर्भ, मराठवाड्यात यलो अलर्ट जारी केला आहे. पूर्व विदर्भामध्ये उष्णतेची लाट येईल, असा इशाराही दिला आहे.

उष्णतेची लाट कुठे?

राज्यातील धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक, अकोला, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये बुधवारपासून उष्णतेची लाट येईल, असा इशारा देण्यात आला आहे. दिवसा व रात्री देखील हवामान दमट व उष्ण राहण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस कमी होऊन, गुरुवारपासून (दि.२३) तापमानात वाढ होईल असेही डॉ. कश्यपी यांनी सांगितले.

Web Title: Heat wave warning in Vidarbha, Marathwada along with Pune; Forecast by Meteorological Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.