उजनीत जलपर्णीचे ढीग

By admin | Published: August 27, 2014 05:15 AM2014-08-27T05:15:32+5:302014-08-27T05:15:32+5:30

उजनी धरणातील पाणी प्रदूषणाची मगरमिठी अधिकच गडद बनत चालेली आहे. एरवी धरणात केवळ हिरव्या गडद रंगाचे पाणी पाहावयास मिळते

Heath water heater | उजनीत जलपर्णीचे ढीग

उजनीत जलपर्णीचे ढीग

Next

लोणी देवकर : उजनी धरणातील पाणी प्रदूषणाची मगरमिठी अधिकच गडद बनत चालेली आहे. एरवी धरणात केवळ हिरव्या गडद रंगाचे पाणी पाहावयास मिळते. परंतु, सध्या पुणे परिसरातून वाहत आलेल्या जलपर्णीचे ढीगच्या ढीग वाहत येत आहेत. किनाऱ्यावर जलपर्णीचे थर साठल्याने पाण्याचा उग्र वास येत आहे.
प्रदूषणाचे गंभीर परिणाम उजनी धरणकाठच्या नागरिकांप्रमाणेच जैवविविधतेवर होत आहे. संपूर्ण पर्यावरणाच्या साखळीवर याचा विपरित परिणाम होत आहे.
एकेकाळी उजनी धरण म्हणजे गोड्या पाण्याचे सर्वांत मोठे सरोवर म्हणून ज्याची ख्याती होती. आज ते धरण सर्वांत मोठ्या दूषित पाण्याचा साठा बनला आहे. पुणे व परिसरात असणाऱ्या विविध रासायनिक कंपन्या, साखर कारखाने व औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता हे पाणी पावसाळ्याच्या दिवसांत ओढ्यात सोडून दिल्याने आणि पुढे पावसाच्या पाण्यात वाहत जाऊन धरणात मिसळल्याने पाणी प्रदूषित झाले आहे. सध्या पाण्यावर गडद हिरवट रंगाचा थर चढला आहे. पाण्याची दुर्गंधी वाढलेली आहे.
डिकसळ व कुंभारगाव परिसरात घडलेले मिथेन वायूूचे स्फोट हे त्याचे ताजे पुरावे आहेत. सध्या पुणे परिसरातून वाहत येणाऱ्या पाण्यासोबत विविध प्रकारचे कागद, घनकचरा, प्लॅस्टिक दुधाच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या मोठ्या संख्येने जलपर्णी वाहत येत आहे. त्या पाण्यामुळे मासेमारी करण्यासाठी पाण्यात उतरलेल्या मच्छीमारांंना व शेतकऱ्यांच्या पायाला खाज सुटत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात उजनी प्रदूषण बचाव अभियानाचे अनिल खोत, पोपट नगरे, संजय शेलार, रामदास बांडे, आबा काटे, आनंद एकाड, अकबर सय्यद आदींच्या शिष्टमंडळाने पाण्यातून वाहत आलेली जलपर्णी पाहून चिंता व्यक्त केली. (वार्ताहर)

Web Title: Heath water heater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.