जिल्ह्यात ‘ताप’ वाढतोय!

By admin | Published: October 29, 2014 10:52 PM2014-10-29T22:52:41+5:302014-10-29T22:52:41+5:30

राजगुरुनगर व परिसरात डेंग्यूसदृश विषाणूजन्य रोगाची साथ पसरली आहे. ही साथ डेंग्यूसदृश आहे; पण ती डेंग्यूचीच असल्याचे अजून निष्पन्न झालेले नाही,

'Heating' in the district is growing! | जिल्ह्यात ‘ताप’ वाढतोय!

जिल्ह्यात ‘ताप’ वाढतोय!

Next
विषाणूजन्य रोगाची साथ : बारामतीनंतर इंदापूर व राजगुरुनगरलाही रुग्ण
राजगुरुनगर : राजगुरुनगर व परिसरात डेंग्यूसदृश विषाणूजन्य रोगाची साथ पसरली आहे. ही साथ डेंग्यूसदृश आहे; पण ती डेंग्यूचीच असल्याचे अजून निष्पन्न झालेले नाही, असे तालुका आरोग्य अधिकारी एस. आर. गोरे यांनी सांगितले. 
तालुका आरोग्य अधिका:यांच्या माहितीनुसार, अशा प्रकारचे आतार्पयत 17 रुग्ण आढळले आहेत. त्यांची एनएस-1 चाचणी होकारार्थी आली आहे. परंतु राष्ट्रीय विषाणुशास्त्र संस्थने हा डेंग्यू असल्याला दुजोरा दिलेला नाही. आतार्पयत 14 नमुने या संस्थेकडे पाठविले आहेत; परंतु त्यात डेंग्यू नसल्याचा अहवाल या संस्थेने दिला आहे, असे गोरे यांनी सांगितले.  
राजगुरुनगर, राक्षेवाडी, कडूस, होलेवाडी, खरपुडी, पाईट या गावांमध्ये या रोगाचे रुग्ण सापडल्याचे डॉ. गोरे यांनी सांगितले. राजगुरुनगर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून दोन नमुने तपासणीसाठी पाठविले, त्यात डेंग्यू नसल्याचा अहवाल आल्याचे वैद्यकीय अधिकारी पूनम महाजन यांनी सांगितले. 
खासगी डॉक्टर्स मात्र हा डेंग्यू असल्याचे सांगतात. या साथरोगाची लक्षणो आणि एनएस-1 चाचणी होकारार्थी असणो व ‘प्लेटलेट्स’ कमी होणो हा डेंग्यू असल्याचे निदर्शक आहे, असे त्यांचे म्हणणो आहे. 
डॉक्टर विनायक गवळी यांनी रुग्णालयात या महिन्यात डेंग्यूचे 7 रुग्ण दाखल झाल्याचे सांगितले. डॉक्टर एम. बी भुजबळ आणि  डॉक्टर एम. एम. भुजबळ या दाम्पत्याने त्यांच्या रुग्णालयात अनेक डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे सांगितले. साधारणपणो लोकही त्यांच्या वस्तीत डेंग्यूचे रुग्ण असल्याचे सांगत आहेत. 
या विषाणूजन्य आजाराच्या साथीच्या प्रतिबंधक उपायांसाठी प्रशासन सज्ज झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी गोरे यांनी सांगितले. परिसर स्वच्छ ठेवणो, गटारे वाहती ठेवणो, डबकी बुजविणो ही कामे स्थानिक प्रशासन हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतींनी आपापल्या गावात धूरफवारणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. हा विषाणूजन्य आजार डासांमुळे पसरत असल्याने नागरिकांनी डासप्रतिबंधक उपाय घरात योजावेत. (वार्ताहर)
 
एनएस-1 चाचणीचे ‘किट’ उपलब्ध नाही
सरकारी आरोग्य केंद्रात एनएस-1 चाचणीचे ‘कीट’ उपलब्ध नसल्याने गरीब रुग्णांची अडचण होत आहे. सुमारे 375 रुपयांना हे ‘किट’ मिळते. मात्र, काही व्यावसायिक ते 85क् रुपयांना विकतात, अशा तक्रारी आल्या आहेत. सरकारी केंद्रांत ते उपलब्ध नसल्याने नमुने पुण्याला प्रयोगशाळेतून तपासून येईर्पयत निदानाची वाट पाहावी लागत आहे. 
 
बारामती शहरात डेंग्यूने थैमान घातले असून, हा ‘ताप’ आता जिल्ह्यात इतरत्रही फैलावत आहे. इंदापूर शहरातील कसबा भागात डेंग्यू आणि गोचीड तापाने नागरिक त्रस्त आहेत. तर राजगुरुनगर व परिसरात डेंग्यूसदृश विषाणूजन्य रोगाची साथ पसरली आहे. 
 
इंदापुरात डेंग्यूचे रूग्ण वाढले
इंदापूर : नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे इंदापूर शहरातील कसबा भागात डेंग्यू आणि गोचीड तापाने थैमान घातले आहे. संसर्गजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत शहरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 
शहरातील श्रीरामवेस नाक्यापासून ते चांदतारा मस्जिदी र्पयतच्या परिसरातील सांडपाणी तहसीलदार कचेरीच्या मागे झाडीत साठत आहे. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीत वाढ होत आहे. याठिकाणी नगरपालिकेने भूमिगत गटारीचे काम अर्धवट सोडले आहे. त्यामुळे हे सांडपाणी वाहून जाण्यास जागा नाही. 
शहरातील कसबा भागातील अनेक नागरिक डेंग्यू व गोचीड तापाने आजारी आहेत. येथील अफसर तय्यब शेख या युवकाच्या प्लेटलेट्स कमी झाल्याने पुणो येथील केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणो येथील अनेक रहिवाशांना डेंग्यू आणि गोचीड तापाने बेजार केले आहे. 
रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तसेच नगरपालिकेच्या कारभाराबाबत संतापाची भावनाही वाढीस लागली आहे. तरी लवकारात लवकर स्वच्छता आणि योग्य उपाययोजनांची अमलबजावणी व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)

 

Web Title: 'Heating' in the district is growing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.