नीरा-सोमेश्वरनगर परिसरात पावसाची जोरदार बॅटींग; पूल वाहून गेल्याने नगर-सातारा वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 03:11 PM2022-09-07T15:11:26+5:302022-09-07T15:12:39+5:30

नगर सातारा रस्त्यावरील नीरा येथील बुवासाहेब ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प..

Heavy batting of rain in Neera-Someshwarnagar area; Bridge washed away, Nagar-Satara traffic stopped...! | नीरा-सोमेश्वरनगर परिसरात पावसाची जोरदार बॅटींग; पूल वाहून गेल्याने नगर-सातारा वाहतूक ठप्प

नीरा-सोमेश्वरनगर परिसरात पावसाची जोरदार बॅटींग; पूल वाहून गेल्याने नगर-सातारा वाहतूक ठप्प

Next

सोमेश्वरनगर (पुणे) : सोमवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी आणि रात्री झालेल्या पावसाने ओढया- नाल्यांना पूर आले. परिसरात झालेल्या जोरदार पावसाने नीरा येथील बुवासाहेब नगर मधील १५ तर गडदरवाडी येथील म्हसोबावस्तीमधील पाच घरात पाणी शिरले आहे. रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. तर ऊस, सोयाबीन इतर भाजीपाला पिके पाण्याखाली गेली आहेत. नगर सातारा रस्त्यावरील नीरा येथील बुवासाहेब ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

काल सायंकाळी व रात्री सोमेश्वरनगर व नीरा परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. नीरा बारामती रस्ता, मोरगाव सोमेश्वरनगर रस्ता अनेक ठिकाणी ओढ्याना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच नीरा येथील बुवासाहेब ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने सातारा मार्गे नगरला जाणारी व नगर मार्गे सातारा का जाणारी तसेच बारामती मार्गे नीरा लोणंद व सातारा येथे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

नगर-सातारा रस्त्यावरील नीरा येथील बुवासाहेब ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे पश्चिम भागात हाहाकार उडाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहेत. मंगळवारी रात्री सोमेश्वरनगर व नीरा परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. नीरा बारामती रस्ता, मोरगाव- सोमेश्वरनगर रस्ता अशा अनेक ठिकाणी ओढ्याना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. नीरा येथील बुवासाहेब ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने सातारा नगर महामार्ग बंद झाला आहे. गणपती आगमनानंतर गेल्या आठ दिवसांपासून पश्चिम भागाला कमीअधिक प्रमाणात पावसाने झोडपून काढले आहे. मंगळवारी रात्री दहाच्या दरम्यान मुसळधार आणि नंतर ढगफुटी पाऊस झाला.

सोमेश्वरनगर परिसरातील सर्वच ओढ्यांना पुर आला आहे. निरा, गुळंचे, पिंपरे, पाडेगाव, राख, निंबुत, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, करंजे, करंजेपुल, वाघळवाडी मुरुम, वाणेवाडी आदी भागाला पावसाने जोरदार तडाखा दिला. फरांदेनगर येथे पुराच्या पाण्यात एक जण वाहून जात असताना स्थानिक युवकांनी त्याला वाचवले. निरा रस्त्यावरील जुन्या काळातील छोटे पुल असल्याने या पुलांची उंची वाढविण्याची मागणी होत आहे. पावसात घराचे व घरातील साहित्यांचे तसेच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई बाबत तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान वीर धरणातून निरा नदीत रात्री मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

Web Title: Heavy batting of rain in Neera-Someshwarnagar area; Bridge washed away, Nagar-Satara traffic stopped...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.