जड झाले ओझे...
By Admin | Published: July 25, 2015 04:36 AM2015-07-25T04:36:16+5:302015-07-25T04:36:16+5:30
रस्त्यावरील विमलाबाई गरवारे प्रशालेतील काही विद्यार्थ्यांच्या दप्तरींचे वजन बुधवारी केले. त्यावेळी शासनाच्या आदेशपेक्षा अधिक म्हणजे सुमारे
पुणे : कर्वे रस्त्यावरील विमलाबाई गरवारे प्रशालेतील काही विद्यार्थ्यांच्या दप्तरींचे वजन बुधवारी केले. त्यावेळी शासनाच्या आदेशपेक्षा अधिक म्हणजे सुमारे ४.५ ते ६ किलो वजनाची दप्तरे विद्यार्थ्यांच्या पाठीवर असल्याचे दिसून आले. त्यामुळे दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबना होत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी दप्तरांच्या ओझ्यामुळे खांदे व पाय दुखत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना अनेकदा वेळापत्रकानुसार दप्तर घेवून येण्यास सांगितले. परंतु, एकाच दप्तरात क्लासची वह्या-पुस्तके व गाईड घेवून विद्यार्थी येतात, असे एका शिक्षिकेने संगितले.
विमलाबाई गरवारे प्रशाला
इयत्ताविद्यार्थ्यांचे वजन (किलो)दप्तराचे वजन (किलो)
आठवी३२ ५
नववी४२ ५.५
सातवी३० ५
सहावी२८ ४.५
दप्तर घेवून येताना खांदे दुखतात. त्यामुळे पप्पांनी सायकल घेवून दिली आहे. मात्र, शाळेत आल्यानंतर दप्तरांचे ओझे घेवून पायऱ्या चढताना पाय खूप दुखतात.’’
- एक विद्यार्थी
डॉन बॉस्को स्कूल
इयत्ताविद्यार्थ्याचे वजन दप्तराचे वजन
पहिली२२४
दुसरी२६४
तिसरी३३५
चौथी३६६
पाचवी२६६
सहावी३८७
आठवी५४७
नववी६६७
एका रिक्षामध्ये साधारणपणे ६ ते ७ विद्यार्थी बसतात. विद्यार्थ्यांना बसण्यास लागणाऱ्या जागेपेक्षा त्यांचा दप्तरांनाच अधिक जागा लागते. पावसाळ्यात अनेक वेळा विद्यार्थ्यांचे दप्तर भिजते. कोणत्या एकाच शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे जास्त नाही. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे प्रमाणापेक्षा अधिक आहे. त्यामुळे पालकांनी आणि शाळांनीच विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
- काशीनाथ ओव्हाळ, रिक्षावाले काका
लक्ष्मणराव आपटे प्रशाला
दररोज जेवढी वह्या-पुस्तके लागतात, तेवढेच घेवून येतो, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. दप्तराच्या वजनाने कधी-कधी खांदा दुखावतो. तर काही विद्यार्थ्यांनी दप्तराचे ओझे वाटत नाही, असे सांगितले. विद्यार्थी वाहतूककरणाऱ्या रिक्षाचालकांनीही रिक्षातून उतरल्यानंतर शाळेत जाईपर्यंतही काही विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे अधिक होते, असे नमुद केले.
इयत्ताविद्यार्थ्याचे वजनदप्तराचे वजन
पहिली१६२.५
दुसरी१७४
तिसरी२३४
चौथी२९५
पाचवी२९६
सहावी३८.५४.५
सातवी३०६
नववी६०८
धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय (मनपा शाळा)
शाळेच्या इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमाच्या बहुतेक विद्यार्थ्यांच्या बॅगेत जेवणाचे डबे व पाण्याची बाटली आढळून आली. एकाच बॅगेत यासह वह्या-पुस्तकांचे ओझे भरले जाते.
इयत्ताविद्यार्थ्याचे वजनदप्तराचे वजन
पहिली१४१
दुसरी १४३
तिसरी१८२
चौथी२३४
पाचवी२१४
सहावी२५६
सातवी२८४
न्यू इंग्लिश स्कूल
इंग्रजी माध्यम : दप्तराचे वजन कितीही कमी करायचे म्हटले तरी ते होत नाही. दररोज वह्या, पुस्तके जेवढी आवश्यक आहेत, तेवढीच देतो. पण तरीही ते एवढे होतेच. त्यात जेवणाचा डब्बा आणि पाण्याच्या बाटलीची भर पडते, असे शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले.
ुइयत्ताविद्यार्थ्याचे वजनदप्तराचे वजन
दुसरी२१३
तिसरी२७४
चौथी२८५
पाचवी३९५
सहावी३६७
रोझरी स्कूल
शाळा सुटली होती, सर्व मुले स्कूल बस तर काही आॅटोेची वाट पाहत उभी होती. परंतू त्यांची दप्तर खाद्यांवर न दिसता जमिनीवरती दिसत होती. त्यांना विचारले असता दप्तर जड असल्यामुळे आम्ही ते खाली ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.
इयत्तामुलाचे वजन दप्तराचे वजन
पाचवी३४६
सहावी५६६
सातवी४६६
आठवी५२८
नववी४८८
दहावी५७१०
गेनबा सोपानराव मोझे शाळा
इयत्तामुलाचे वजन (किलो)दप्तराचे वजन (किलो)
सिनिअर के.जी१८२
नरसरी१२१
दुसरी१६५
तिसरी२२७
चौथी२३६
पाचवी२९६
सहावी४३५
सातवी२२५
सातवी३५६
नववी४९९
दहावी५९९