Pune Rain: पुण्यात दुपारी प्रचंड उकाडा अन् सायंकाळी गारांसह पावसाचा अंदाज
By श्रीकिशन काळे | Published: June 2, 2023 04:58 PM2023-06-02T16:58:58+5:302023-06-02T16:59:21+5:30
नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, कारण उष्णतेमुळे चक्कर येऊ शकते
पुणे: पुणे शहरात दुपारी प्रचंड उकाडा जाणवत असून, सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन गारांसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये देखील अशीच स्थिती राहणार आहे. तर उष्णतेची लाट देखील येण्याची शक्यता वर्तविली आहे.
शहरातील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने उष्णतेच्या झळा पुणेकरांना झोंबत आहेत. शुक्रवारी दुपारी आकाश निरभ्र राहील आणि त्यामुळे प्रचंड उकाडा निर्माण होईल. परिणामी पुणेकरांनी दुपारी घराबाहेर न पडणे पसंत केले. सध्या पुढील दोन-तीन दिवस देखील अशीच स्थिती राहणार आहे. विजांच्या कडकडाटासह, जोरदार वारा येऊन पाऊस पडेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, कारण उष्णतेमुळे चक्कर येऊ शकते, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे.
गेल्या २४ तासांतील पाऊस
डुडुळगाव : ५९ मिमी
भोर : ५८.५ मिमी
पाषाण : १८.० मिमी
माळीण : १७.५ मिमी
चिंचवड : ९.० मिमी
शिवाजीनगर : ७.१ मिमी
कोरेगाव पार्क : ०.५