वाल्हे परिसरात पावसाची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:10 AM2021-05-24T04:10:50+5:302021-05-24T04:10:50+5:30
वाल्हे परिसासरात गेल्या आठ दिवसांपासून नागरिक उष्णतेने हैराण झाले होते. सकाळी उन पडले होते. मात्र, सायंकाळी ५.३० वाजता ...
वाल्हे परिसासरात गेल्या आठ दिवसांपासून नागरिक उष्णतेने हैराण झाले होते. सकाळी उन पडले होते. मात्र, सायंकाळी ५.३० वाजता अचानक वातावरणात बदल झाला आणि ढग दाटून आले. थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली. एक तास मुसळधार पाऊस बरसल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसामुळे कोथिंबिरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या सोबतच पावटा,भुईमूग, तुर,गवार, भेंडीच्या रानातपाणी साचल्यामुळे तळ्यांचे स्वरुप आले होते. तर पिंगोरी, आडाची वाडी, बापसाई वस्ती, हनुमान वस्ती, वरचा मळा, पातर मळा मध्ये पावसाने चांगलेच झोडपले. येथील अंजीर, चिकू, पेरू सहित आंब्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जनावरांचा चारा मका व कडवळही जमीनदोस्त झाले. ज्यांनी जमिनीची मशागत करून ठेवली होती, त्या जमिनीला या पावसाचा चागंला फायदा होणार आहे.
फोटो