Pune Rain: पुण्यात ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 01:48 PM2024-09-24T13:48:35+5:302024-09-24T13:48:53+5:30

रविवारपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे 

Heavy rain begins in Pune with thunder Roads again form rivers | Pune Rain: पुण्यात ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप

Pune Rain: पुण्यात ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप

पुणे : माॅन्सून आता परतीच्या प्रवासाला निघाला असून, पुणे शहरात रविवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आजही सकाळपासून ढगाळ वातावरण झाले होते. दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक भागात रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप आल्याचे दिसून आले. 

सिंहगड रस्ता, बाणेर-बालेवाडी, सातारा रस्ता, कात्रज, लष्कर परिसर, हडपसर, कात्रज, लोहगाव विमाननगर अशा सर्वच परिसरांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे कात्रज-कोंढवा रस्त्यासह नगर रस्ता, सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याचे चित्र होते. जोरदार पावसामुळे शहरातील काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस गायबच झाला होता; पण रविवारी रात्री परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम राजस्थान व कच्छच्या काही भागांतून नैर्ऋत्य मौसमी पावसाच्या परतीसाठी अनुकूल वातावरण आहे. या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. २३ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थान व कच्छच्या काही भागांतून नैर्ऋत्य मौसमी पावसाच्या परतीसाठी अनुकूल वातावरण असणार आहे. रविवारी राज्यात अनेक भागांत पाऊस झाला. तसेच येत्या दोन दिवसांत विदर्भातील काही जिल्ह्यांत, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तर कोकण विभागांमध्येही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २३ ते २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात, तर २३ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा व कोकण गोव्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे, तर २४ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पाऊस होईल, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

पुण्यात जोरदार हजेरी...

पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस गायब होता. तापमानातदेखील वाढ झाली होती. त्यामुळे चांगलीच उष्णता वाढली होती. रविवारी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट पुणेकरांना अनुभवायला आला. काही मिनिटांमध्येच रस्त्यांवरून पाणी वाहत होते. 

Web Title: Heavy rain begins in Pune with thunder Roads again form rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.