Heavy Rain: बारामतीला वादळी पावसाने झोडपले; शहरातील अनेक भागात झाडे पडली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 07:35 PM2022-05-11T19:35:46+5:302022-05-11T19:35:56+5:30

पावसामुळे असह्य उकाड्याने हैराण झालेल्या बारामतीकराना काहीसा दिलासा

Heavy Rain: Heavy rains lash Baramati; Trees fell in many parts of the city | Heavy Rain: बारामतीला वादळी पावसाने झोडपले; शहरातील अनेक भागात झाडे पडली

Heavy Rain: बारामतीला वादळी पावसाने झोडपले; शहरातील अनेक भागात झाडे पडली

googlenewsNext

बारामती : बारामती शहराला मंगळवारी (दि 11)सायंकाळी वादळी पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली. पाणी साठल्याने ठिकठिकाणी वाहनचालकांची धांदल उडाली. मंगळवारी सायंकाळी अचानक ढग दाटून आले. काही वेळात धडकी भरणारे वादळी वारे वाहू लागले. विजांचा कडकडाट संपल्यानंतर तुफानी पाऊस झाला. अवघ्या अर्ध्या ते पाऊण तास झालेल्या पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले होते. भिगवण रस्ता आणि ,एमआयडिसी रस्त्यावर अनेक झाडे उन्मळून पडली.

अंगावर काटा आणणाऱ्या वादळी पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला. वादळाने शहरातील वीजपुरवठा, इंटरनेट व्यवस्था कोलमडून पडल्याचे चित्र होते. मात्र या पावसामुळे असह्य उकाड्याने हैराण झालेल्या बारामतीकराना काहीसा दिलासा मिळाला.
 

Web Title: Heavy Rain: Heavy rains lash Baramati; Trees fell in many parts of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.