पुण्यात पावसाचा धुमाकूळ! धरणे १०० टक्के भरली, मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 10:40 AM2022-09-16T10:40:04+5:302022-09-16T10:40:30+5:30

पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला..

Heavy rain in Pune All the dams are 100 percent full, water discharge in Mutha river will increase | पुण्यात पावसाचा धुमाकूळ! धरणे १०० टक्के भरली, मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढणार

पुण्यात पावसाचा धुमाकूळ! धरणे १०० टक्के भरली, मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढणार

googlenewsNext

पुणे :पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर परिसरात आज पहाटेपासून संततधारा सुरू आहे. सकाळपासून पुणेकरांना सुर्याचे दर्शनही झालेले नाही. शहर परिसरासोबत खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरण परिसरातही मोठा पाऊस सुरू आहे. शहरात सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक संथ गतीने पुढे सरकत होते. पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे.

त्याचबरोबर खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात व येव्यात वारंवार वाढ होत आहे. येत्या ३ ते ४ तासांमध्ये  खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये विसर्ग वाढवला जाणार आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा १७,६७१ क्युसेक्स विसर्ग वाढवून स. ११:०० वा. १९,२८९ क्यूसेक्स करण्यात येत आहे.

नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Heavy rain in Pune All the dams are 100 percent full, water discharge in Mutha river will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.