मुसळधार पावसाने उडवली पुणेकरांची झाेप ; शहरात सर्वत्र हाहाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 23:56 IST2019-09-25T23:53:00+5:302019-09-25T23:56:21+5:30
पुणे शहरात मुसळधार पाऊस पडत असून अनेक रस्ते जलमय झाले आहेत तर काही ठिकाणी पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरले आहे.

मुसळधार पावसाने उडवली पुणेकरांची झाेप ; शहरात सर्वत्र हाहाकार
पुणेः रात्री आठ वाजता सुरु झालेल्या पावसाने शहरात हाहाकार माजवला आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे शहरातील सर्वच भागातील रस्ते जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. रस्त्यावरच्या पाण्यात अनेकांच्या गाड्या बंद पडल्या असून नागरिक आता जीव मुठीत धरुन घराची वाट पकडत आहेत.
शहरातील विविध भागांमधील सद्यस्थिती
- वारजे ब्रिज खाली पाणी घुसले वारजे ते कोथरुड रस्ता बंद.
- सहकारनगर तळजाईला जाणारा रस्ता तेथील नाला फुटल्यामुळे ब्लॉक झाला आहे. गजानन महाराज मठ ते पुढपर्यंत भरपूर पाणी साचले असून गाड्या वाहून जात आहेत.
- कोल्हेवाडी परिसरात देखील दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आलंय
- पेठामध्ये रस्त्यावर जागोजागी पाणी साठले आहे. तसेच सोसायटीमध्ये पाणी जमा झाले आहे.
- बाणेर रस्त्यावर सिंध सोसायटी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दोन एक फूट पाण्यातून चारचाकी गाड्याही जाताना बंद पडत आहेत.
- दांडेकर पूल झोपड पट्टी मधून आंबील ओढ्यातून आलेले पाणी शिरले आहे, पोलीस पाण्यात उतरून लोकांना घरातून सुरक्षीत बाहेर काढत आहेत.
- बालाजीनगर, संतोषनगर, कात्रज, आंबेगाव खुर्द अत्यन्त गंभीर परिस्थिती, कात्रज बोगदा परिसर दरड कोसळली, आनेक ठिकाणी गाड्या वाहून गेल्या, पहिल्या मजल्या पर्यंत पाणी भरले आहे.
पुणे शहर व परिसरात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. आम्ही महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे तरी कृपया नागरिकांनी काळजी करू नये तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. याच बरोबर कुणाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास माझ्याशी संपर्क करावा.
-मुक्ता टिळक, महापौर, पुणे
म.न.पा आपत्कालीन कक्ष - ९६८९९३१५११