पुण्याला पावसाने झोडपले ; जाणून घ्या विविध भागांची स्थिती LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 01:38 AM2019-09-26T01:38:51+5:302019-09-26T01:41:23+5:30
पुणे शहराला सुमारे तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे . अशा स्थितीत शहरात ढगफुटी झाल्याच्या अफवेने नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे कात्रज तलाव फुटल्याच्या अफवेनेही जोर धरला आहे. सध्या हवामान खाते आणि महापालिकेने या अफवाच असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांना त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पुणे :पुणे शहराला सुमारे तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे . अशा स्थितीत शहरात ढगफुटी झाल्याच्या अफवेने नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे कात्रज तलाव फुटल्याच्या अफवेनेही जोर धरला आहे. सध्या हवामान खाते आणि महापालिकेने या अफवाच असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांना त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
शहरातील विविध भागांमधील सद्यस्थिती (रात्री दीड वाजता )
-फर्ग्युसन आणि जंगली महाराज रस्त्यावर गुडघाभर पाणी ; वाहने अडकली
- वारजे पुलाच्या खाली पाणी शिरले, वारजे ते कोथरुड रस्ता बंद.
- सहकारनगर तळजाईला जाणारा रस्ता बंद आहे. गजानन महाराज मठ ते पुढेपर्यंत भरपूर पाणी साचले असून गाड्या वाहून जात आहेत.
-बिबवेवाडी-सातारा रस्त्यावर प्रंचड पाणी आल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.
-सिंहगड रस्ता दुभाजकावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्त्याची एक बाजू पूर्ण बंद आहे.
- कोल्हेवाडी परिसरातदेखील दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आले आहे.
- बाणेर रस्त्यावर सिंध सोसायटी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दोन फूट पाण्यातून जाताना चारचाकी गाड्याही बंद पडत आहेत.
- दांडेकर पूल झोपडपट्टीत आंबील ओढ्यातून आलेले पाणी शिरले आहे, पोलीस पाण्यात उतरून लोकांना घरातून सुरक्षित बाहेर काढत आहेत.
- बालाजीनगर, संतोषनगर, कात्रज, आंबेगाव खुर्द गंभीर परिस्थिती ; नवले हॉस्पिटलच्या तळ मजल्यावर पाणी
-कात्रज बोगदा परिसरात दरड कोसळली ; आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल