जिल्ह्यात सर्वत्र जाेरदार पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:17 AM2021-09-08T04:17:01+5:302021-09-08T04:17:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सर्वत्र पाऊस होत आहे. पुणे जिल्ह्यात ...

Heavy rain showers all over the district | जिल्ह्यात सर्वत्र जाेरदार पावसाच्या सरी

जिल्ह्यात सर्वत्र जाेरदार पावसाच्या सरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सर्वत्र पाऊस होत आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून, पाबळ येथे सर्वाधिक ९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत शिवाजीनगर येथे २०.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेला पाऊस. मगरपट्टा २० मिमी, चिंचवड ३०.५, एनडीए १४.५, गिरीवन ९, डुडुलगाव २६, माळीण (आंबेगाव) १८, तळेगाव ढमढेरे ४९, पाषाण १७, बल्लाळवाडी (जुन्नर) २८, लवळे १४.५, एनईएस लकडी(इंदापूर) १५, पाबळ (शिरूर) ९३ मिमी, वडगाव शेरी ४५, खडकवाडी (आंबेगाव) ५६, वाल्हे (पुरंदर) ४३.५, वेताळे (खेड) १४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बुधवार शहरात आकाश ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Web Title: Heavy rain showers all over the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.