राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; दहावीचा पुरवणी परीक्षेचा इतिहासाचा पेपर पुढे ढकलला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 10:07 AM2023-07-28T10:07:35+5:302023-07-28T10:07:43+5:30

दहावीच्या पुरवणी परीक्षा लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही

Heavy rain warning in some districts of the state; History paper of 10th supplementary examination has been postponed | राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; दहावीचा पुरवणी परीक्षेचा इतिहासाचा पेपर पुढे ढकलला

राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; दहावीचा पुरवणी परीक्षेचा इतिहासाचा पेपर पुढे ढकलला

googlenewsNext

पुणे: हवामान विभागाकडून राज्याच्या काही जिल्ह्यांत शुक्रवारी (दि.२८) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा शुक्रवारी होणारा इतिहास व राज्यशास्त्र विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा १८ जुलैपासून सुरू झाली आहे. दहावीची परीक्षा १ ऑगस्टपर्यंत तर बारावीची १० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार होती. तर शुक्रवारी इयत्ता दहावीचा सामाजिक शास्त्र पेपर एक इतिहास व राज्यशास्त्र विषयाची परीक्षा होती.

शुक्रवारी राज्याच्या काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने इतिहासाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आता ही परीक्षा दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत घेतली जाणार असल्याची माहिती मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षा लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Heavy rain warning in some districts of the state; History paper of 10th supplementary examination has been postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.