पुणे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर : मुठा पुन्हा वाहिली दुथडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 11:19 AM2019-09-05T11:19:43+5:302019-09-05T11:21:12+5:30
नदीपात्रालगत असलेला भिडे पूल व दोन्ही पात्रांच्या बाजूचे रस्ते देखील पाण्याखाली गेले होते...
पुणे : धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून तब्बल ३१ हजार ४४९ क्युसेक पाणी सोडले. त्यामुळे मुठा नदी पुन्हा दुथडी वाहिली. नदीपात्रालगत असलेला भिडे पूल व दोन्ही पात्रांच्या बाजूचे रस्ते देखील पाण्याखाली गेले होते. त्यामुळे शहरातील रस्ते वाहतूक काहीशी विस्कळीत झाली.
वडीवळे धरण पाणलोटक्षेत्रात बुधवारी सकाळी आठपर्यंत ९६, आंद्रा ५८, पवना १०६, कासारसाई ४०, मुळशी ९९, टेमघर ८३, वरसगाव ७०, पानशेत ७१ व खडकवासला धरणक्षेत्रात १९ मिलिमीटर पाऊस झाला. गुंजवणी धरण पाणलोटक्षेत्रात ४७, नीरा देवघर ४४, भाटघर १६, वीर व उजनीला प्रत्येकी १ मिलिमीटर पाऊस झाला.
बुधवारी दिवसभर देखील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला. सायंकाळी पाचपर्यंत वडीवळे ५३, पवना २५, मुळशी ३४, टेमघर, वरसगाव व पानशेतला प्रत्येकी ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर, खडकवासला धरण क्षेत्रात १७ मिलिमीटर पाऊस झाला.
बुधवारी रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे बुधवारी सकाळी नऊ वाजता टेमघर धरणातून ६०४, वरसगाव १० हजार ९५, पानशेत धरणातून ९,८३४ क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे पुढे खडकवासला धरणातून २७,२०३ क्युसेकने पाणी सोडले.
...........
सायंकाळी टेमघर धरणातील विसर्ग थांबविला. तर, वरसगाव धरणातून १२,४३५ व पानशेतमधून ५,५३२ क्सुसेक पाणी खडकवासला धरणात सोडण्यात येत होते. सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणातील विसर्ग ३१,४४९ क्युसेकपर्यंत वाढविला.
..........
मुळशी धरणातूनही २० हजार क्युसेक पाणी सोडले होते. त्यामुळे बंडगार्डन येथून तब्बल ४८,७८३ क्युसेक पाणी उजनी धरणाकडे गेले. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासल्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. खडकवासला धरणातून ४ ते ८ आॅगस्ट दरम्यान साडेबावीस अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मुठा नदीत सोडले होते.
.......
गुंजवणी धरणातून २,५३०, नीरा देवघर ५,११०, भाटघरमधून ७,८२० क्युसेक पाणी सोडले. तर, वीर धरणातून पुढे ३२,५०९ क्युसेक पाणी नीरा नदीत सोडले.
........