धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:09 AM2021-06-20T04:09:45+5:302021-06-20T04:09:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डिंभे : पुणे जिल्ह्यात येणाऱ्या भीमा खोऱ्यातील एकूण २६ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या दमदार ...

Heavy rainfall in the dam catchment area | धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डिंभे : पुणे जिल्ह्यात येणाऱ्या भीमा खोऱ्यातील एकूण २६ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या दमदार पाऊस कोसळत आहे. पाटबंधारे विभागाकडून शनिवारी सकाळी घेतलेल्या आकडेवारीनुसार: मागील २४ तासांत मुळशी येथे सर्वांत जास्त १३४ मिमी, तर टेमघर येथे ११० मिमी पावसाची नोंद झाली. तर पवना धरण परिसरात १०२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. डोंगरदऱ्यात कोसळणाऱ्या पावसामुळे सह्याद्रीच्या पर्वत रांगातील ओढ्या-नाल्यांना पाणी आले आहे, हे पाणी धरणात जमा होण्यास सुरुवात झाल्याने धरणांच्या पाणीपातळीत हळुहळू वाढ होत आहे.

भीमा खोऱ्यातील एकूण २६ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही भागात तर मुसळधार पाऊस होत आहे. शनिवारी काही भागात पावसाने थोडीशी विश्रांती घेतली असली तर अतिदुर्गम भागात पावसाचे प्रमाण चांगले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या अनेक भागात चांगला पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या होत्या. यामुळे पावसाची वाट बघा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले होते. काही ठिकाणी पेरण्या झाल्या होत्या. मात्र, पाऊस न झाल्याने पुन्हा दुबार पेरण्या कराव्या लागतील की काय, अशी भीती निर्माण झाली होती. अखेर गेल्या दोन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्याने पेरण्यांना पोषक असे वातावरण तयार झाले आहे. हा पाऊस पेरण्यांसाठी योग्य असल्याने शेतकरी पुन्हा शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे.

धरणाचे नाव टक्केवारी उपयुक्त पाणीसाठ (टीएमसी) आजचा पाऊस (मिमी)

पिंपळगाव जोगा -६७.३५टक्के -२.६२ टीएमसी ५५ मिमी

माणिकडोह ६.०० टक्के ०.६१ टीएमसी २९ मिमी

येडगाव ३८.२६ टक्के ०.७४ टीएमसी २० मिमी

वडज २२.२५ टक्के ०.२६ टीएमसी २४ मिमी

डिंभे २०.८६टक्के २.६१टीएमसी ३९ मिमी

घोड ३.८६टक्के ०.१९टीएमसी ११ मिमी

विसापूर १२.१८ टक्के ०.११ टीएमसी १ मिमी

कळमोडी २१.७७ टक्के ०.३३टीएमसी ७१ मिमी

चासकमान १२.४३ टक्के ०.९४ टीएमसी ४२ मिमी

भामा आसखेड ३९.५८ टक्के ३.०३टीएमसी ५१ मिमी

वडिवळे २७.३४ टक्के ०.२९ टीएमसी ८० मिमी

आंद्रा ६ ४.८०टक्के १.८९ टीएमसी ७८ मिमी

पिंपळगाव जोगा ६७.३५ टक्के -२.६२ टीएमसी ५५ मिमी

पवना ३१.९३टक्के २.७२टीएमसी १०२ मिमी

कासारसाई ४९.६३ टक्के ०.२८टीएमसी ६४ मिमी

मुळशी ८.९३टक्के १.८०टीएमसी १३४ मिमी

टेमघर ११.२३टक्के ०.४२ टीएमसी ११० मिमी

वरसगाव १७.६७टक्के २.२७ टीएमसी ५१ मिमी

पानशेत ३३.०५टक्के ३.५२टीएमसी ५६ मिमी

खडकवासला ६२.१७ टक्के १.२३ टीएमसी ४५ मिमी

गुंजवणी -३९.८३टक्के १.४७ टीएमसी ५९ मिमी.

निरादेवधर ९.६९टक्के १.१४ टीएमसी ५७ मीमी

भाटघर ११.०३टक्के २.५९ टीएमसी ३६ मिमी

वीर ३८.३१ टक्के ३.६० टीएमसी २२ मिमी

नाझरे १५.५४ टक्के ०.०९टीएमसी १९ मिमी

उजनी १६.७२ टक्के -८.९६टीएमसी ९मिमी

चिल्हेवाडी १०.६५ टक्के ०.०९टीएमसी ९ मिमी

फोटो : जिल्ह्यात येणाऱ्या २६ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाने दमदार हजेरी लावली असून डिंभे धरण परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. (छायाचित्र-कांताराम भवारी)

Web Title: Heavy rainfall in the dam catchment area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.