पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात ; शहरासह उपनगर भागालाही झोडपले 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 03:05 PM2020-03-25T15:05:34+5:302020-03-25T15:08:51+5:30

पुणे शहरासह उपनगर भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी पहाटेही शहरातील अनेक भागात पाऊस झाला होता. त्यातच दुपारी पुन्हा अवकाळी सरी कोसळल्या आहेत. 

Heavy rains begin in Pune city and out side area | पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात ; शहरासह उपनगर भागालाही झोडपले 

पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात ; शहरासह उपनगर भागालाही झोडपले 

Next

पुणे : पुणे शहरासह उपनगर भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी पहाटेही शहरातील अनेक भागात पाऊस झाला होता. त्यातच दुपारी पुन्हा अवकाळी सरी कोसळल्या आहेत. 

     पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस शहर व ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरला असून शहरातील विविध पेठांसह कोथरूड, हडपसर, कोंढवा, बिबवेवाडी या उपनगर भागातही पावसाने हजेरी लावली. यावेळी मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट सुरु होता. सध्या देशात कोरोना विषाणूमुळे लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे, त्याचा परिणाम म्हणून जास्त संख्येने नागरिक रस्त्यांवर नाहीत.

पुण्यात सिंहगड रस्ता, बुधवार पेठ, हडपसर, कोथरूड, शिवाजीनगर, कात्रज, वारजे भागात तर ग्रामीण भागात मुळाशी, भूगाव, बावधन पट्ट्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे ग्रामीण भागात कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत असून त्यामुळे पिकावर रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अवकाळी पावसामुळे ज्वारी आणि गहू पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाल्याचे बघायला मिळाले. 

Web Title: Heavy rains begin in Pune city and out side area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.