अतिवृष्टीमुळे पुणे व औरंगाबाद विभागात मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:11 AM2020-12-24T04:11:40+5:302020-12-24T04:11:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विभागात जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेली अतिवृष्टी त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा मोठा फटका पुणे ...

Heavy rains cause severe damage in Pune and Aurangabad divisions | अतिवृष्टीमुळे पुणे व औरंगाबाद विभागात मोठे नुकसान

अतिवृष्टीमुळे पुणे व औरंगाबाद विभागात मोठे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : विभागात जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेली अतिवृष्टी त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा मोठा फटका पुणे आणि औरंगाबाद विभागातील जिल्ह्यांना बसला आहे. यात पुणे विभागात सोयाबीन, उडीद, तूर, कापूस, बाजरी या पिकांचे आणि पालेभाज्या, फळे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचबरोबर रस्ते, वीज, घरे यांसारख्या पायाभूत सुविधांवर परिणाम झालेला निदर्शनास आला आहे. झालेल्या नुकसानापोटी केंद्राकडून अधिकाधिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल, असे केंद्रीय पथक प्रमुख रमेश कुमार यांनी येथे सांगितले.

पुणे विभागात माहे जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबतचा केंद्रीय पथकाने बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. आतंर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाचे प्रमुख रमेश कुमार, ग्राम विकास विभागाचे उपसचिव यशपाल, केंद्रीय वित्त विभागाचे सल्लागार आर. बी. कौल, कृषी मंत्रालयाचे संचालक आर. पी. सिंग, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास, अधीक्षक अभियंता एम. एस. सहारे, उपसचिव सुभाष उमराणीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड, पुणे, सातारा, सोलापूर व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अनुक्रमे डॉ. राजेश देशमुख, शेखर सिंह, मिलींद शंभरकर, दौलत देसाई, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते.

रमेश कुमार म्हणाले, केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्याबरोबरच त्या योजनांचा वापर नागरिकांनी कशाप्रकारे केला पाहिजे याबाबत ग्रामसभा आयोजित करुन माहिती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. आपत्ती ही आपत्ती असते. आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करणे. आंतर जिल्हा समन्वय ठेवून नुकसानाची अहवाल तयार करणे याबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करावी, असेही त्यांनी सुचविले.

केंद्रीय पथकास पुणे विभागात माहे जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Web Title: Heavy rains cause severe damage in Pune and Aurangabad divisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.