अतिवृष्टीमुळे खेडमधील ७४ गावांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:10 AM2021-08-01T04:10:22+5:302021-08-01T04:10:22+5:30
तालुक्यात पश्चिम भागातील घाटमाथ्यावरची गावे या अतिवृष्टीमुळे बाधित होऊन शेतजमिनी, बांध फुटतुटीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्याने याची झळ पिकांच्या ...
तालुक्यात पश्चिम भागातील घाटमाथ्यावरची गावे या अतिवृष्टीमुळे बाधित होऊन शेतजमिनी, बांध फुटतुटीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्याने याची झळ पिकांच्या नुकसानीला बसली आहे. गेल्या दि. २२, २३, २५ जुलैच्या अतिवृष्टीमुळे कुडे मंडलात तीन आणि वाडा मंडलमधील एक अशी चार घरे अशंतः बाधित झाली. तर २९३ हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत एक हजार ९३ शेतजमिनीसह पीक नुकसानीचे पंचनामे झाले आहे. तर जवळपास एक हजार २०० हून अधिक शेतकऱ्यांचे पंचनामे करणे बाकी असल्याची माहिती महसूल नायब तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली. यामध्ये वाडा मंडलमध्ये २४ गावांतून ४७८ पंचनामे उरकले असून, ४७७ पंचनामे करणे बाकी आहे. कुडे मंडलात ३० गावांमधील ४०१ पंचनामे उरकल्यानंतर ३०९ पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पाईट मंडलात १६ गावांतील १६९ पंचनामे होऊन २९२ पंचनामे शिल्लक आहेत. आणि कडूस मंडलमध्ये ४ गावांतील ४५ पंचेनामे पूर्ण होऊन १०५ शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहेत, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार राजेश कानसकर यांनी दिली.