खोर परिसरात वादळी पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:09 AM2021-04-12T04:09:40+5:302021-04-12T04:09:40+5:30
परिसरात सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली होती. वादळी वाऱ्याचे प्रमाण देखील जास्त होते. यावेळी पहिल्यांदाच गारांचा पाऊस झाल्याने शेतातील ...
परिसरात सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली होती. वादळी वाऱ्याचे प्रमाण देखील जास्त होते. यावेळी पहिल्यांदाच गारांचा पाऊस झाल्याने शेतातील मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर काही ठिकाणी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेले असून काही ठिकाणी घरांच्या भिंती देखील पडल्या आहेत. खोर येथील खडकवस्ती परिसरात पोपट सोमनाथ माने यांच्या गोठ्याच्या भिंती पडून त्यावरील पत्रे उडून गेले आहेत. तर दुसरीकडे पिंपळाचीवाडी परिसरात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. येथील शेतकरी बापू दादासो माळवदकर यांची कारल्याची बाग पूर्णतः जोपली गेली आहे. याबाबत माहिती देताना बापू माळवदकर म्हणाले की, एक एकर कारल्याची शेती असून आज पर्यंत जवळपास २ लाख २५ हजार इतका खर्च करण्यात आला आहे. सध्या तीन दिवसाला ६० कॅरेट इतका माल निघत होता. आज मार्केट मध्ये एक कॅरेट ५०० ते ५५० रुपये भावाने जात आहेत. परंतु तोंडात आलेला घास पावसाने हिरावून घेतला. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या प्राथमिक नुकसानीचे पंचनामे करून शेतकरी वर्गाला नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी आता शेतकरी करू लागला आहे.
११ खोर पाऊस
पावसामुळे पत्र्याचे शेडचे झालेले नुकसान
११ खोर पाऊस १
पिंपळाचीवाडी येथील कारल्याची बाग भुईसपाट झाली.