पुणे शहरात पावसाची जोरदार बॅटिंग ; अर्ध्या तासात ५० मिमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 07:36 PM2020-06-29T19:36:49+5:302020-06-29T19:41:07+5:30

मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज

Heavy rains hit Pune city; 50 mm of rain in half an hour | पुणे शहरात पावसाची जोरदार बॅटिंग ; अर्ध्या तासात ५० मिमी पाऊस

पुणे शहरात पावसाची जोरदार बॅटिंग ; अर्ध्या तासात ५० मिमी पाऊस

Next
ठळक मुद्देरस्त्यांना आले ओढ्यांचे स्वरुप गेल्या दोन तीन दिवसांपासून दिवसाच्या तापमानात चांगलीच झाली होती वाढ

पुणे : शहरात सोमवारी दुपारी अचानक आलेल्या जोरदार पावसाने शहराच्या अनेक भागात रस्त्याना ओढ्याचे स्वरुप आले होते. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसाची शिवाजीनगर येथे ५० मिमी नोंद झाली होती. त्याचवेळी लोहगाव येथे ११ मिमी पाऊस झाला तर कात्रज येथे ५.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 
गेल्या दोन तीन दिवसांपासून दिवसाच्या तापमानात चांगलीच वाढ झाली होती. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. जिल्ह्यात काल इंदापूर येथे मुसळधार पाऊस झाला तरी पुणेकर पावसाच्या प्रतिक्षेत होते. आज सकाळपासूनच उकाडा वाढला होता़ दुपारनंतर अचानक आकाशात ढग दाटून आले़ दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरीचा वर्षाव सुरु झाला़ शहराच्या मध्य व पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक होता़ सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला.


 या हंगामातील पहिल्याच पावसात महापालिकेच्या कामाचा फुगा फुटला. या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप आले होते़ नागझरीचे पाणी ड्रेनेजमधून थेट रस्त्यावर आल्याने नरपतगिरी चौकात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. चौकातून वाहने पुढे नेताना अडचणी येत होत्या़ अशीच परिस्थिती शहरातील अनेक ठिकाणी दिसून आली. 
या पावसाबरोबरच जोरदार वाऱ्यामुळे दोन ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. मात्र, त्यात कोणताही इजा झाली नाही. सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतरही शहरात पावसाच्या सरी अधूनमधून येत होत्या.
उद्या मंगळवारी शहरात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Web Title: Heavy rains hit Pune city; 50 mm of rain in half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.