कोकणात पावसाचा जोर कायम : मध्य महाराष्ट्रात मुसळधार, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 09:20 PM2019-08-10T21:20:14+5:302019-08-10T21:25:28+5:30
मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़ कोकण, गोव्यात तुरळक ठिकाण मुसळधार पाऊस पडला़.
पुणे : मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़ कोकण, गोव्यात तुरळक ठिकाण मुसळधार पाऊस पडला़. विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
सध्या गुजरात, कोकण, मध्य महाराष्ट्रातील मॉन्सूनचा जोर सध्या कमी झाला आहे़. पूर्व राजस्थान, कर्नाटकाच्या किनारी भागात मॉन्सून सक्रीय आहे़. अरबी समुद्राला उधाण आले असून समुद्र खळवलेला असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
कोकणात बहुतांशी ठिकाणी पाऊस पडत असून सध्या त्याचा जोर कमी झाला आहे़. मध्य महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे़ . मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला़ मराठवाड्यातील अर्धापूर, हिमायतनगर, उमरी येथे १० मिमी पावसाची नोंद झाली होती़. विदर्भात अर्जुन मोरगाव ३० मिमी पाऊस पडला असून काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे़. रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे़. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी ११ ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
गेल्या २४ तासात आजरा १९०, राधानगरी १८०, शिरगाव, महाबळेश्वर १७०, त्र्यंबकेश्वर १५०, पौड मुळशी १४०, ताम्हिणी, दावडी, चंदगड, गारगोटी ११०, अंम्बोणे, वैभववाडी १००, माथेरान, राजापूर, नंदुरबार, पन्हाळा, पाटण, डुंगरवाडी ८०, भोर, गडहिंग्लज, जावळी मेधा, शाहूवाडी, वाणगाव, अप्पर
वैतरणा, खालापूर, कुडाळ, लांजा ७०, भिरा, शिरोटा, कागल, लोणावळा, पेठ, तळोदा ६० मिमी पावसाची नोंद झाली होती़.