पुण्यात मुसळधार पाऊस त्यात ढगफुटीची अफवा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 12:57 AM2019-09-26T00:57:20+5:302019-09-26T01:06:15+5:30

पुणे शहराला सुमारे तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले असताना ढगफुटी झाल्याच्या अफवेने नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. हवामान खाते आणि महापालिकेने स्पष्ट केले असून शहरात काही समाजमाध्यमांवर ढगफुटीची अफवा पसरल्याचे समजत आहे.

Heavy rains in Pune and rumors of thunderstorms in Pune | पुण्यात मुसळधार पाऊस त्यात ढगफुटीची अफवा 

पुण्यात मुसळधार पाऊस त्यात ढगफुटीची अफवा 

googlenewsNext

पुणे : पुणे शहराला सुमारे तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले असताना ढगफुटी झाल्याच्या अफवेने नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. हवामान खाते आणि महापालिकेने स्पष्ट केले असून शहरात काही समाजमाध्यमांवर ढगफुटीची अफवा पसरल्याचे समजत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने त्रेधातिरपीट उडवली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. उपनगर भागातील बरेच रस्ते पाण्याखाली असून वाहतूक थांबवण्यात आली आहे.


याच वेळी समाजमाध्यमे अर्थात सोशल मीडियावर ढगफुटी झाल्याची आणि होऊ शकते असा मेसेज व्हायरल झाला आहे. मात्र यात काहीही तथ्य नसून बुधवारी झालेला पाऊस हा ढगफुटी नसल्याचे हवामान खात्याच्या डॉ अनुराग कश्यपी यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, 'शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असला तरी याला ढगफुटी म्हणता येणार नाही'.


दुसरीकडे महापौर मुक्ता टिळक यांनीही त्यासंबंधीचा संदेश जारी केला आहे. त्या म्हणाल्यात की, पुणे शहर व परिसरात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे तरी कृपया नागरिकांनी काळजी करू नये तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये'.

शहरातील विविध भागांमधील सद्यस्थिती (रात्री १ वाजता )

- वारजे पुलाच्या खाली पाणी घुसले, वारजे ते कोथरुड रस्ता बंद.

- सहकारनगर तळजाईला जाणारा रस्ता बंद  आहे. गजानन महाराज मठ ते पुढेपर्यंत भरपूर पाणी साचले असून गाड्या वाहून जात आहेत.

- कोल्हेवाडी परिसरातदेखील दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आले आहे. 

- बाणेर रस्त्यावर सिंध सोसायटी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दोन फूट पाण्यातून  जाताना चारचाकी गाड्याही बंद पडत आहेत.

- दांडेकर पूल झोपडपट्टीत आंबील ओढ्यातून आलेले पाणी शिरले आहे, पोलीस पाण्यात उतरून लोकांना घरातून सुरक्षित बाहेर काढत आहेत.

- बालाजीनगर, संतोषनगर, कात्रज, आंबेगाव खुर्द गंभीर परिस्थिती, 

-कात्रज बोगदा परिसर दरड कोसळली

Web Title: Heavy rains in Pune and rumors of thunderstorms in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.