पुण्यात अतिवृष्टी; शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 07:32 AM2019-09-26T07:32:27+5:302019-09-26T08:01:00+5:30

पुणे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना गुरुवारी 26 सप्टेंबर, 2019 रोजी सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

Heavy rains in Pune; Schools, colleges announced today a holiday | पुण्यात अतिवृष्टी; शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर

पुण्यात अतिवृष्टी; शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर

Next

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यांतील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना गुरुवारी 26 सप्टेंबर, 2019 रोजी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पाच तालुक्यातील शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल रात्री शहरात झालेल्या पावसाने उच्चांक गाठला. रात्री 8 च्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. शहरातील सर्वच भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरात अतिवृष्टी होत असल्याने तसेच आपत्कालीन परिस्तिथी निर्माण झाली असल्याने पुणे जिह्यातील 5 तालुक्यांच्या शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.

Web Title: Heavy rains in Pune; Schools, colleges announced today a holiday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.