निमसाखर रस्त्यावरील खड्डे बुजवले, प्रवास होणार सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 02:29 AM2018-11-17T02:29:29+5:302018-11-17T02:30:56+5:30

प्रवास होणार सुखकर : नागरिकांनी केली होती मागणी

Heavy roads on the road, he will fly | निमसाखर रस्त्यावरील खड्डे बुजवले, प्रवास होणार सुखकर

निमसाखर रस्त्यावरील खड्डे बुजवले, प्रवास होणार सुखकर

Next

निमसाखर : निमसाखर ते चौपन्न फाटा या रस्त्यावर नुकतेच डांबर टाकुन खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले. अवैध सायपन साठी खोदल्यामुळे अनेक ठिकाणी उखडलेला, खचलेला अशी या रस्त्याची अवस्था होती. मात्र नुकतेच सार्वजनिक बांधकाम खात्याने पडलेले खड्डे बुजवल्याने प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

बारामती- निरा नरसिंहपूर या राज्य मार्गावर निमसाखर हे सुमारे सहा हजार लोकसंख्या असलेल्या गाव आहे. मोठी लोकसंख्या असलेले आणि नीरा नदी काठी वसलेले हे गाव आहे. निमसाखर पासून ५४ फाटा हा रस्ता सुमारे नऊ किलोमीटरचा आहे. यापैकी सर्वसाधारण पाच किलोमीटरचा रस्ता बऱ्यापैकी स्थितीत आहे. तर उरलेला रस्ता चौपण फाट्यापासून निमसाखर दिशेला सर्वसाधारण दीड ते दोन किलोमीटर रस्ता पूर्णपणे खचलेला रस्त्याची खडी उघडलेली बाजूला काटेरी झुडपे आणि पाईपलाईनसाठी खोदलेल्या चाºया अशी अवस्था या रस्त्याची आहे. या रस्त्यावरून उसाची वाहतूक होत असते. दूध संघाचे अनेक टँकर व दूध संकलन करणारी अनेक वाहने या रस्त्याचा वापर करून जात असतात. या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचे नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याने कळवले होते. मात्र याकडे संबंधित खात्याच्या अधिकाºयांकडून दुर्लक्ष होत होते नंतरच्या काळामध्ये लोकांच्या तक्रारी वाढल्या. यामुळे या रस्त्यावर डागडुजी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले. या रस्त्याचा वापर करुन प्रवास करणाºया प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

भोलावडे ते महुडे रस्त्याची दयनीय अवस्था

महुडे : खोºयात जाणारा एकमेव भोलावडे ते महुडे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा,अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. भोलावडेपासून महुडेला जाणाºया या १० किमी. रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यावर प्रचंड मोठ्ठे खड्डे तयार झाल्याने समोरून येणाºया वाहनाला कोणत्या बाजूने जावे हे समजत नाही. साइडपट्ट्या पूर्ण पणे खचलेल्या आहेत त्यामुळे रस्त्यावरून वाहन खाली उतरवण्यासाठी वाहन चालकांना प्रश्न पडला आहे. या भागातील शेतकºयांचे मुख्यपीक भातशेती व दुग्ध व्यवसाय होय. दुग्ध व्यवसाय करणारे शेतकºयांना शहरात दूध घेवून येण्यासाठी खड्डामुळे गाडी चालवणे अवघड होत असल्याचे दुग्ध व्यवसायिक ज्ञानेश्वर दुधाणे (नांद) ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. या भागातील नागरिकांची , दुग्धव्यवसायकांची, वाहनचालक रस्ता दुरुस्तीची मागणी करीत आहेत.

 

Web Title: Heavy roads on the road, he will fly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.