वारजे येथे महामार्गावर ट्रक पलटल्यामुळे वाहतुकीचे तीन तेरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:48 PM2018-08-28T13:48:42+5:302018-08-28T13:54:27+5:30

सुरतहून पार्सल घेऊन निघालेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास डुक्कर खिंडीच्या पूलाच्या उतारावर हा अपघात घडला.

heavy traffic jaam Due to truck accident on highway at Warje | वारजे येथे महामार्गावर ट्रक पलटल्यामुळे वाहतुकीचे तीन तेरा 

वारजे येथे महामार्गावर ट्रक पलटल्यामुळे वाहतुकीचे तीन तेरा 

googlenewsNext
ठळक मुद्देभरलेला अवजड ट्रक क्रेनने उचलणे अवघड असल्याने पार्सल बाहेर काढावे लागले अकरा वाजले तरी परिसरातील वाहतुक सुरळीत नाही

वारजे : मुंबई बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर वारजे येथील अतुलनगर समोर ट्रक पलटी झाल्याने महामर्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोमवारी (दि. २८ ) पहाटे तीन वाजता अपघात होऊनही पलटी झालेला ट्रक काढायला सकाळी साडे नऊ वाजल्याने या ठिकाणी 
    याबाबत सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, सूरतहून पार्सल घेऊन हा ट्रक (केए.२२ ए. ८६९७) बंगळुरूच्या दिशेने निघाला होता. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास डुक्कर खिंडीच्या पुढे रुणवाल पूलाच्या उतारावर  चालकाचे नियंत्रण सुटले. याठिकाणी माई मंगेशकरजवळ नवीन पुलाचे काम सुरु असल्याने अंधारात कठड्याचा अंदाज न आल्याने गाडी त्याच्यावरूनच घसरुन पलटी झाल्याचा अंदाज वाहतूक कर्मचारी व पोलिसांनी व्यक्त केला. सुदैवाने यात चालकास कोणतीच इजा झाली नाही. 
    यानंतर वाहतूक विभागाकडून काहीप्रमाणात वाहतुक वळवण्याचा प्रयत्न केला. पण सकाळी सातनंतर मात्र या ठिकाणी चांदणी चौक व वडगाव दोन्ही बाजूला कोंडी वाढत गेली. भरलेला अवजड ट्रक क्रेनने उचलणे अवघड जात असल्याने यातील पार्सल बाहेर काढून ट्रक मोकळा करण्यात आला. व सकाळी साडे नऊच्या सुमारास ट्रक बाजूला काढण्यात आला. संपूर्ण वारजे परिसर, महामार्ग व सेवा रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी पाहायला मिळाली. अकरा वाजले तरी परिसरातील वाहतुक सुरळीत झाली नव्हती. 
................................
 सदर पलटी झालेला ट्रक काढल्यावरही त्याचे डिझेल व आॅइल महामार्गावर सांडले होते. वाहतुक कोंडीमुळे अग्निशमन विभागाची गाडी अपघातग्रस्त ठिकाणी पोहोचायला उशीर झाला. रस्त्यावरील आॅइल धुवून काढल्यानंतर ही मार्गिका (लेन) सुरु करण्यात आली. अजय चांदखेडे - पोलीस निरीक्षक, वाहतुक वारजे विभाग 

Web Title: heavy traffic jaam Due to truck accident on highway at Warje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.