राजेगावातून जवानांसाठी राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:45 AM2018-08-21T01:45:16+5:302018-08-21T01:45:45+5:30
राजेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘राखी सैनिकांसाठी’ या उपक्रमांतर्गत एक हजार राख्या जमा करून जवानांसाठी सीमेवर पाठविण्यासाठी नियोजन केले आहे.
राजेगाव : येथील राजेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘राखीसैनिकांसाठी’ या उपक्रमांतर्गत एक हजार राख्या जमा करून जवानांसाठी सीमेवर पाठविण्यासाठी नियोजन केले आहे. राखी पौैर्णिमेपर्यंत या राख्या सैनिकांपर्यंत पोहोच होतील अशा पद्धतीने नियोजन केले असल्याची माहिती मुख्याध्यापक सोमनाथ तांबे यांनी दिली.
उपक्रमासाठी विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या वेळी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष शिवाजी मोरे, राजेगाव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश मोघे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक सोमनाथ तांबे, लतिका वाळके, अरुण भोपळे, सुरेश नवले, सुभाष फासगे, सुनील शिंदे, राजेंद्र जाधव, गणेश चोपडे, सुनील घालमे, विठ्ठल मदने, दिलीप ढमे, सुनील डंगाने, विकास गायकवाड, प्रिया खैरे आदींनी परिश्रम घेतले.