नामदेवराव आल्हाट यांना ‘हेलन केलर पुरस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:43+5:302021-06-29T04:08:43+5:30

पुणे : सामान्य माणसांना जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही ते दिव्यांगांना अंत:चक्षुमुळे आणि जीवनदृष्टीमुळे दिसते. केवळ दृष्टीमुळे नव्हे तर ...

'Helen Keller Award' to Namdevrao Alhat | नामदेवराव आल्हाट यांना ‘हेलन केलर पुरस्कार’

नामदेवराव आल्हाट यांना ‘हेलन केलर पुरस्कार’

Next

पुणे : सामान्य माणसांना जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही ते दिव्यांगांना अंत:चक्षुमुळे आणि जीवनदृष्टीमुळे दिसते. केवळ दृष्टीमुळे नव्हे तर जीवनदृष्टीमुळे जगणे प्रकाशमान होते. असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे हेलन केलर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘हेलन केलर पुरस्कार’ महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांग संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव उर्फ दादा आल्हाट यांना प्रतिभा शाहू मोडक यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, विश्वस्त मैथिली आडकर, शेतकरी कामगार पक्षाचे शहर अध्यक्ष सागर आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रा. जोशी म्हणाले, आपण जसा विचार करतो त्याप्रमाणे आपली बुद्धी आणि कर्मेंद्रिये कार्य करीत असतात. म्हणून मनात नकारात्मक विचारांना स्थान देता कामा नये. कोरोनाच्या या विश्वव्यापी संकटाने धावत सुटलेल्या माणसांना जीवनाविषयी अधिक अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले आहे.

प्रतिभा शाहू मोडक व नामदेवराव आल्हाट यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. ॲड प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले.

-------------------------------------------

Web Title: 'Helen Keller Award' to Namdevrao Alhat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.