Helicopter Crash Pune: पुण्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले; प्रवासी सुखरूप, एक जण रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 15:34 IST2024-08-24T15:32:50+5:302024-08-24T15:34:49+5:30
पौड भागात पावसाचा जोर कायम असल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर

Helicopter Crash Pune: पुण्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले; प्रवासी सुखरूप, एक जण रुग्णालयात दाखल
पुणे : पुणे जिल्ह्यातील पौड भागात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे हेलिकॉप्टर मुंबईवरून हैद्राबादला जात असल्याची माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टरमधले लोक सुखरूप आहेत. एका प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले; प्रवासी सुखरूप, एक जण रुग्णालयात दाखल#Pune#helicopter#rain#nature#paudpic.twitter.com/VekbBFrNyw
— Lokmat (@lokmat) August 24, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. शहरात संततधार तर ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. अशातच पुण्यातील पौड भागात पावसाचा जोर कायम असल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली. अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप कळू शकले नाही. हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन आनंद, दिर भाटिया, अमरदीप सिंग एस पी राम हे चार जण प्रवास करत होते. त्यापैकी तिघांची प्रकृती स्थिर असून कॅप्टन आनंद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.