जेजुरी गडाभोवती हेलिकॉप्टरच्या घिरट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:14 AM2021-08-21T04:14:39+5:302021-08-21T04:14:39+5:30
याबाबत मार्तंड देवसंस्थानशी संपर्क साधला असता देवसंस्थानचे सर्वच विश्वस्त मुंबईला धर्मादाय आयुक्त कार्यालयात गेल्याचे समजले. मात्र त्यांना ही ...
याबाबत मार्तंड देवसंस्थानशी संपर्क साधला असता देवसंस्थानचे सर्वच विश्वस्त मुंबईला धर्मादाय आयुक्त कार्यालयात गेल्याचे समजले. मात्र त्यांना ही याबाबत काहीच माहिती नसल्याचेच सांगण्यात आले.
यामुळे हा नेमका काय प्रकार आहे याचीच चर्चा दिवसभर जेजुरीत होती. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या या गडाबाबत शासकीय पातळीवरून सुमारे साडेतीनशे रुपये खर्चाचा आराखडा नुकताच मंजूर झाला असल्याने कदाचित मंदिर परिसराची पाहणी सुरू असेल, असा सर्वांचाच समज झाला होता. मात्र घिरट्या सतत होऊ लागल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.
वास्तविक महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने हे मंदिर अत्यंत महत्त्वाचे व तेवढेच संवेदनशील असल्याने शासनाकडून गडाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात असताना असा प्रकार गंभीरच आहे. शिवाय मंदिरावरून हेलिकॉप्टरच्या घिरट्या होत असताना मंदिराच्या भिंतींना हादरे बसल्याने भिंतींना तडाही जाऊ शकतो. याबाबत कोणीच कसे गंभीर नाही याचीच चर्चा आज दिवसभर जेजुरीत होती.
---------------------
फोटो क्रमांक : २०
फोटो मेल केला आहे
जेजुरी गडाभोवती घिरट्या घालणारे हेलिकॉप्टर.
200821\img-20210820-wa0064.jpg
मंदिराभोवती घिरट्या घालणारे हॅलोकॉप्टर