हॅलो...मी शरद पवार बोलतोय, पैसे देऊन टाक, प्रकरण संपवून टाक! चाकणमध्ये खंडणीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 06:02 PM2021-08-12T18:02:48+5:302021-08-12T18:12:14+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून खंडणी मागितली

"Hello ... I am talking Sharad Pawar, pay the money, finish the case ..."; Crime filed in Chakan | हॅलो...मी शरद पवार बोलतोय, पैसे देऊन टाक, प्रकरण संपवून टाक! चाकणमध्ये खंडणीचा गुन्हा

हॅलो...मी शरद पवार बोलतोय, पैसे देऊन टाक, प्रकरण संपवून टाक! चाकणमध्ये खंडणीचा गुन्हा

googlenewsNext

पिंपरी : हॅलो... मी शरद पवार बोलतोय, पैसे देऊन टाक, प्रकरण संपवून टाक, असे म्हणून पैशांची मागणी केली. कोणत्यातरी वेबसाईटचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून खंडणी मागितली. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चाकण येथे जानेवारी ते ९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.

धीरज धनाजी पठारे (रा. यशवंत नगर, खराडी, पुणे) व त्याचे अनोळखी साथीदार, यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रतापराव वामन खांडेभराड (वय ५४, रा. कडाचीवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आरोपीकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाच्या पैशांसाठी आरोपीने फिर्यादीला वारंवार फोन करून धमकी दिली. आरोपी हा ३० मे २०२१ रोजी फिर्यादीच्या घरी आला. व्याजाचे पाच कोटी रुपये द्याच, असे म्हणून आरोपीने धमकी देत खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर माझ्याशी गाठ आहे. मी तुम्हाला बघून घेईल, तुम्हाला दोघांना जिवंत सोडणार नाही, कोणत्याही प्रकारे संपवून टाकीन अशी धमकीही आरोपीने दिली.

आरोपीने नऊ ऑगस्ट रोजी कोणत्यातरी वेबसाईटचा वापर करून अज्ञात इसमाच्या मार्फत फिर्यादीला फोन केला. हॅलो, मी शरद पवार बोलतोय, पैसे देऊन टाक, प्रकरण संपवून टाक, असे म्हणून आरोपींनी शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करून फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. याप्रकरणी आरोपी पठारे व त्याला इंटरनेटद्वारे खोटे कॉल करून त्याला साथ देणारे त्याचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपींनी कम्प्युटरचा वापर करून फिर्यादीला कॉल केला. यात आरोपीच्या फोन नंबर ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील घरातील फोन नंबर दिसत होता. इंटरनेटद्वारे असा खोटा कॉल करून आरोपींनी आवाजाची नक्कल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
- कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड. 

Web Title: "Hello ... I am talking Sharad Pawar, pay the money, finish the case ..."; Crime filed in Chakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.