हँलो मायकेल... सॉरी, आज कोणी ख्रिश्चन बांधव कॉल नाही स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:11 AM2021-04-02T04:11:32+5:302021-04-02T04:11:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रभू येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवले तो स्मरणदिन म्हणजे ‘गुड फ्रायडे’. यानिमित्त ख्रिश्चन समाज उपवास ...

Hello Michael ... Sorry, no Christian will accept a call today | हँलो मायकेल... सॉरी, आज कोणी ख्रिश्चन बांधव कॉल नाही स्वीकारणार

हँलो मायकेल... सॉरी, आज कोणी ख्रिश्चन बांधव कॉल नाही स्वीकारणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्रभू येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवले तो स्मरणदिन म्हणजे ‘गुड फ्रायडे’. यानिमित्त ख्रिश्चन समाज उपवास करतो. यावेळी एका वेगळ्या उपवासाचे नियोजन करण्यात आले आहे. हा उपवास असणार आहे ‘गॅजेट्स’चा. शुक्रवारी (दि.३) पुण्यातील ख्रिश्चन समाजाने ‘गॅजेट्स’चा उपवास पाळावा, असे आवाहन पुणे धर्मप्रांताचे बिशप डॉ. थॉमस डाबरे यांनी केले आहे.

डॉ. डाबरे यांच्या संकल्पनेतून हा उपवास केला जात आहे. येशू ख्रिस्त हे अरण्यात प्रार्थनेला चाळीस दिवस गेले होते. त्यामुळे ख्रिश्चन समाजात चाळीस दिवस उपवास केले जातात. येशू ख्रिस्ताला क्रुसावर देण्यात आले तो दिवस शुक्रवार होता. म्हणजेच ‘गुड फ्रायडे’च्या दिवसापर्यंत हे उपवास सुरू असतात आणि यानंतर ईस्टर संडे साजरा केला जातो.

दरवर्षी केल्या जाणाऱ्या उपवासामध्ये यंदा मोबाइलचा उपवासही करण्याचा निर्णय पुण्यातल्या चर्चने घेतला आहे. यात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाइल किंवा गॅजेट्सचा वापर करायचा नाही, असे ठरले. सध्या मोबाइल फक्त गरजेपुरते न उरता त्याचे व्यसनच अनेकांना लागले आहे. या पार्श्वभूमीवर या अनोख्या उपवासाचा निर्णय घेण्यात आला आहे.

चौकट

मोबाइलच्या व्यसनातून मुक्ततेसाठी

“सध्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मोबाइलचे व्यसन लागले आहे. चर्चमध्येदेखील नागरिक मोबाइल हाताळताना दिसतात. प्रार्थना सभांमध्येदेखील त्यांच्या हातात मोबाइल पाहायला मिळतो. त्यामुळेच नेहमीच्या उपवासाबरोबरच मोबाइलचा उपवास करण्याचादेखील निर्णय मी घेतला. त्याला अनेकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे.”

-बिशप थॉमस डाबरे

Web Title: Hello Michael ... Sorry, no Christian will accept a call today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.