हेल्मेट सक्तीत कंपनीचे हित ; संभाजी ब्रिगेडचा अाराेप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 08:28 PM2018-11-21T20:28:47+5:302018-11-21T20:30:19+5:30

पुणेकरांवर लादण्यात येणारी हेल्मेट सक्ती ही हेल्मेट कंपनीचे हित जाेपासण्यासाठी घेतलेला निर्णय अाहे असा अाराेप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाला अाहे.

helmet compulsion is for company's profit ; allegation by sambhaji brigade | हेल्मेट सक्तीत कंपनीचे हित ; संभाजी ब्रिगेडचा अाराेप

हेल्मेट सक्तीत कंपनीचे हित ; संभाजी ब्रिगेडचा अाराेप

Next

पुणे : येत्या 1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात येणार अाहे. याला विविध स्तरातून विराेध हाेत अाहे. पुणेकरांवर लादण्यात येणारी हेल्मेट सक्ती ही हेल्मेट कंपनीचे हित जाेपासण्यासाठी घेतलेला निर्णय अाहे असा अाराेप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाला अाहे. हेल्मेट सक्ती नकाे, वाहनचालकांना शिस्त लावा अशी मागणीही ब्रिगेडकडून करण्यात अाली अाहे. 

    पुण्याचे पाेलीस अायुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांनी 1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेट सक्ती लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले अाहे. दुचाकीस्वारांच्या अपघातात हेल्मेट नसल्यामुळे मृत्यु झाल्याचे प्रमाण अधिक असल्याने हेल्मेट सक्ती करण्यात येत असल्याचे सांगितले जात अाहे. हेल्मेट सक्तीला हेल्मेट विराेधी कृती समितीकडून कडाडून विराेध हाेत असताना संभाजी ब्रिगेडने सुद्धा या वादात अाता उडी घेतली अाहे. हेल्मेट सक्ती करण्यात हेल्मेट कंपनीचे हित जाेपासण्याचा सरकारचा छुपा अजेंडा असल्याचा अाराेप ब्रिेगेडकडून करण्यात अाला अाहे. तसेच रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करुन शंभर टक्के खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी करण्यात अाली अाहे. 

    याबाबत बाेलताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे म्हणाले, पुणेकरांवर हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय हा कंपनीचे हित जाेपासण्याचा सरकारचा छुपा अजेंडा अाहे की काय अशी शंका येत अाहे. शहरातील रस्ते हे मरणासुन्न अवस्थेत अाहेत. अगाेदर सर्व रस्त्यांची चांगल्या प्रतीची देखभाल दुरुस्ती करणे अावश्यक अाहे. राज्यात गुटखा बंदी करण्यात अाली तरीही गुटखा सर्वत्र छुप्या पद्धतीने विकला जाताे. शहरात 20 ते 30 च्या पुढे वाहनांचा वेग जात नाही. अनेकदा चार-पाच वाहतूक पाेलीस एकत्र एखाद्या चाैकात उभे केले जातात. त्यापेक्षा त्यांनी वाहतूक सुधारण्यावर भर दिल्यास तसेच नागरिकांना शिस्त लावल्यास अपघात हाेणार नाहीत अाणि हेल्मेट सक्तीची गरज पडणार नाही. हेल्मेट घालण्याचे अावाहन करावे मात्र त्याची सक्ती करु नये. 

Web Title: helmet compulsion is for company's profit ; allegation by sambhaji brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.