पुण्यात हेल्मेटसक्तीला विरोध; सविनय कायदेभंग करून काढणार मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 12:20 PM2019-01-01T12:20:04+5:302019-01-01T12:25:20+5:30

पुणे शहर पोलिसांनी आज (1जानेवारीपासून) हेल्मेट नियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केल्यावर पुणेकरांनी त्याला विरोध केला आहे.

helmet must from 1st january residents oppose rule pune | पुण्यात हेल्मेटसक्तीला विरोध; सविनय कायदेभंग करून काढणार मोर्चा

पुण्यात हेल्मेटसक्तीला विरोध; सविनय कायदेभंग करून काढणार मोर्चा

Next
ठळक मुद्देपुणे शहर पोलिसांनी आज हेल्मेट नियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केल्यावर पुणेकरांनी त्याला विरोध  केला आहे.हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीने घेतलेल्या बैठकीत सविनय कायदेभंग करत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या गुरूवारी पत्रकार भवन, नवी पेठ येथून दुचाकीवरून हेल्मेट न घालता पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार

पुणे - पुणे शहर पोलिसांनी आज (1जानेवारीपासून) हेल्मेट नियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केल्यावर पुणेकरांनी त्याला विरोध  केला आहे. शहरातील हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीने घेतलेल्या बैठकीत सविनय कायदेभंग करत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला माजी महापौर अंकुश काकडे, मोहनसिंग राजपाल, शांतीलाल सुरतवाला,संदीप खर्डेकर, विवेक वेलणकर, मंदार जोशी, धनंजय जाधव आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे येत्या गुरूवारी (3 जानेवारी) पत्रकार भवन, नवी पेठ येथून दुचाकीवरून हेल्मेट न घालता पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चानंतर पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चात जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन पुणेकरांना करण्यात आले.

कृती समितीने मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

- कायद्यात हेल्मेटसक्तीची तरतूद नाही.

- आयएसआय हेल्मेटचा आग्रह धरताना त्याची उपलब्धी तपासावी. 

- हेल्मेटसक्तीमध्ये पोलिसांचे आर्थिक हित.

- शहराचे आठ ही आमदार कृती समितीत होते. मात्र सध्या काहीही भूमिका घेत नाहीत.

Web Title: helmet must from 1st january residents oppose rule pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे