हेल्मेटसक्ती याचिकाकर्ते विनीत धांडा यांना धमकी

By admin | Published: December 9, 2014 12:26 AM2014-12-09T00:26:24+5:302014-12-09T00:26:24+5:30

वाहनचालकांकडून पालन होत नसल्याच्या पाश्र्वभूमीवर उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेले वकील विनीत धांडा यांना धमकी देण्यात आली आहे.

Helmet suspect Vineet Dhanda threatens | हेल्मेटसक्ती याचिकाकर्ते विनीत धांडा यांना धमकी

हेल्मेटसक्ती याचिकाकर्ते विनीत धांडा यांना धमकी

Next
पुणो : सर्वोच्च न्यायालयाने एका निकालादरम्यान वाहतूकविषयक दिलेल्या निर्देशांचे पुणो आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचालकांकडून पालन होत नसल्याच्या पाश्र्वभूमीवर उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेले वकील विनीत धांडा यांना धमकी देण्यात आली आहे. याचिका मागे घेण्यासाठी ही धमकी देणा:या दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी धांडा यांच्या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल केला. 
धांडा हे सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वाहतूकविषयक निर्देशांचे पुणो पोलिसांकडून काटेकोटपणो पालन केले जात नाही. तसेच, वाहतूक नियमभंग करणा:यांविरुद्ध कडक कारवाई केली जात नाही. याबाबतची याचिका त्यांनी न्यायालयात दाखल केली आहे. हेल्मेटसक्ती राबविण्याबाबतही या याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे. ज्या संघटना व कार्यकर्ते हेल्मेटसक्तीला विरोध करतात त्यांची नावे सांगण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांनाही नोटीस बजावण्यात आली होती. ही नावे न्यायालयात सादर केली जाणार आहेत.  (प्रतिनिधी)
 
शनिवारी धांडा त्यांची पत्नी व मुलांसह मोटारीतून जात होते, त्या वेळी तीन दुचाकींवरून पाच जण आले. मोटारीला दुचाकी आडवी घालून त्यांना गणोशखिंड रस्त्यावरील सेंट्रल मॉलच्या पुढे असलेल्या श्रीकृष्ण बंगल्याजवळ अडविण्यात आले. त्यांच्या हातात पेट्रोल आणि डिङोलचे कॅन होते. मोटार जाळण्याची धमकी देत न्यायालयात केलेली याचिका पुढच्या वेळी मागे घ्या, असे म्हणत दमदाटी केली. या प्रकरणी धांडा यांच्या पत्नीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Web Title: Helmet suspect Vineet Dhanda threatens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.