बारामती विभागात हेल्मेटसक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 02:41 AM2019-01-22T02:41:10+5:302019-01-22T02:41:12+5:30
पुण्यापाठोपाठ आता बारातमी विभाग म्हणजेच दौंड, बारामती, इंदापूर या तिन्ही शहरांत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने हेल्मेटचा वापर न करणाऱ्या, सीटबेल्ट न लावता चारचाकी वाहन चालविणाºया वाहनचालकांविरुद्ध गुरुवारपासून (दि. २४) कारवाई केली जाणार आहे.
बारामती : पुण्यापाठोपाठ आता बारातमी विभाग म्हणजेच दौंड, बारामती, इंदापूर या तिन्ही शहरांत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने हेल्मेटचा वापर न करणाऱ्या, सीटबेल्ट न लावता चारचाकी वाहन चालविणाºया वाहनचालकांविरुद्ध गुरुवारपासून (दि. २४) कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमध्ये दोषी वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना जप्त करण्यात येणार आहे. दोषी वाहनचालकांना बारामतीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दोन तासांच्या समुपदेशनासाठी हजर राहावे लागणार आहे. अन्यथा वाहनचालकांविरोधात चालविण्यात येणारा खटला निकालात न काढण्याचा इशारा उपप्रादेशिक परीवहन कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे.
उपप्रादेशिक परीवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर याबाबत म्हणाले, रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सर्वाेच्च न्यायालयाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. या पार्श्वभुमीवर वाहन अधिनियम १९८८ चे कलम १९ व केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ च्या नियम २१ अनुसार विविध वाहतुक गुन्ह्यासाठी वाहन चालकांचा परवाना किमान ३ महिने निलंबित करावा. हेल्मेटबाबतचे नियम वाहन चालविणाºया व्यक्तीसह मागे बसलेल्या व्यक्तीसाठी देखील लागु राहणार आहे. वाहन चालविणाºया किंवा मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट बाबत नियमांचा भंग केलेल्या व्यक्ती कडुन तडजोड शुल्क वसुल करण्यापुर्वी त्यांना २ तास कालावधीच्या रस्ता सुरक्षा विषयक नियमांच्या समुूपदेशनासाठी हजर रहावे लागेल, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान केले नसेल किंवा चारचाकी चालविताना सीटबेल्ट लावला नसल्यास संबंधिताचा
वाहन चालविण्याचा परवाना जप्त
होऊ शकतो. शिवाय त्याला बारामतीच्या कार्यालयात दोन तासांच्या सक्तीच्या समुपदेशनालाही हजर राहावे लागणार आहे.
>दर मंगळवार व शुक्रवारी असे समुपदेशन होणार आहे. या समुपदेशनाला हजर राहिल्याशिवाय दोषी वाहनचालकांचा खटला निकाली काढला जाणार नसल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगोलकर यांनी आज दिली. नियम डावलणाºयांविरोधात खटला भरुन किंवा परवाना रद्द करून चालणार नाही, तर दोषी वाहनचालकांचे दोन तासांचे समुपदेशन त्याची सवय बदलण्यास कारणीभूत ठरू शकेल.