पुरंदर शिक्षक संघटनेच्या वतीने मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:10 AM2021-05-27T04:10:03+5:302021-05-27T04:10:03+5:30
विविध संस्था व व्यक्ती यांना ४० हजार १०१ रुपयांची मदत करण्यात आली. यात कोविड सेंटर ११ हजार रुपये, आंबळे ...
विविध संस्था व व्यक्ती यांना ४० हजार १०१ रुपयांची मदत करण्यात आली.
यात कोविड सेंटर ११ हजार रुपये, आंबळे येथील सार्थक सेवा संघ बाल आश्रम दहा हजार १०१ रुपये, पानवडी हायस्कूलमधील मयत शिपाई नामदेव दशरथ पठारे दहा हजार रुपये, पारगाव हायस्कूलमधील अपघातग्रस्त कुटुंब शिपाई धुळा हनुमंत पवार यांना दहा हजार रुपये रोख रक्कम देऊन मदत करण्यात आली.
कोरोनामुळे बाल आश्रम यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून संघटना अनेक उपक्रम राबवत असते. संघटना आर्थिकदृष्ट्या एवढी सक्षम नसली तरी सामाजिक कार्यास नेहमीच पुढाकार असतो व जमेल त्या पद्धतीने मदत करण्यास तयार असते, असे सिद्राम कांबळे यांनी सांगितले.
या वेळी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संजय धुमाळ, अध्यक्ष पांडुरंग जाधव, सचिव सिद्राम कांबळे, लिपिक हक्क परिषदेचे अध्यक्ष अशोक बाणे, कार्याध्यक्ष संदीप चाचर, उपाध्यक्ष कीर्तिकुमार मेमाणे, सोमनाथ शेंडगे, सदस्य ज्ञानेश्वर ठोंबरे, रामचंद्र भोसले, संजय दहितुले, दिनकर बुंदे, सार्थक सेवा संघ आश्रमाचे डॉ. अनिल कुडिया, अक्षय जाधव, वैभव शिंदे, अमृत भांडवलकर आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन संदीप चाचर व अशोक बाणे यांनी केले, तर आभार रामचंद्र भोसले यांनी मानले.
२६ सासवड
सासवड (ता. पुरंदर) येथे मदत करताना पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाचे पदाधिकारी.
===Photopath===
260521\26pun_3_26052021_6.jpg
===Caption===
२६ सासवड सासवड ( ता. पुरंदर ) येथे मदत करताना पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाचे पदाधिकारी.